‘ रिंगरुट’ साठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा – आ. प्रणिती शिंदे

0

सोलापूर शहरासाठी रिंगरुट व सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील कोंडा नगर झोपडपट्टी रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक

सोलापूर : आज बुधवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सोलापूर शहरासाठी त्वरीत रिंगरुट होण्याकरीता व सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील कोंडा नगर झोपडपट्टी रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले होते.यामध्ये सोलापूर शहरातील रिंगरुट साठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

सोलापूर शहरातून होणाऱ्या जड वाहतूकीमुळे अनेक अपघात होत आहेत. ही जड वाहतूक शहरातून कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी रिंगरुट संदर्भात आयोजित बैठकीत मा. जिल्हाधिकारी श्री. मिलिंद शंभरकर साो., मा. सोमपा आयुक्त श्री. दिपक तावरे साो. तसेच प्रकल्प संचालक – राष्ट्रीय महामार्ग श्री. संजय कदम यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सदर रिंगरुटसाठी केंद्र व राज्य शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करण्याचे या बैठकीत ठरले आहे. तसेच सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील कोंडा नगर झोपडपट्टी रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात शासकीय पुनर्वसन योजनेतून त्यांना घर देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे या बैठकीत ठरले आहे.

याप्रसंगी सोमपाचे नगरअभियंता श्री. संदिप कारंजे, नगररचना संचालक श्री. लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता श्री. संजय धनशेट्टी, श्री. गणेश डोंगरे, श्री. नागेश गायकवाड, कौशल्या वाघमारे, इंदू जाधव व बहुसंख्य कोंडा नगर येथील रहिवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here