धक्कादायक !फायर AUDIT ;सोलापूर महानगरपालिकेच्या ऐतिहासिक वास्तु, प्रशासकीय इमारतींचे…

0

सोलापूर महानगरपालिकेच्या ऐतिहासिक हेरिटेज वास्तु तसेच इतर प्रशासकीय इमारतींचे २०१२ पासून फायर अॉडिट झाले नसल्याची बाब उघडकीस आली आहे .सामान्य नागरिक आणि म.न.पा. कर्मचारी यांचा जीव आणि महत्त्वाची कागदपत्रे धोक्यात असल्याचे आता उजेडात आले आहे .सामाजिक कार्यकर्ते विजय कुंदन जाधव यांनी धक्कादायक बाब माहिती अधिकाराच्या माध्यमातून उजेडात आणली आहे.

गिरिकर्णिका फाऊंडेशन च्या वतीने सोलापूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या अग्निशामक दल विभागाकडून खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे. गिरिकर्णिका फाऊंडेशन चे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी अग्निशामक दलास माहितीच्या अधिकाराखाली विचारले होते की, सोलापूर महानगरपालिकेची हेरिटेज वास्तु, महानगरपालिका सभागृह तथा प्रशासकीय इमारतीचे फायर अॉडिट कधी झाले, त्यांची सविस्तर कागदपत्रांसह माहिती मिळावी.

प्राप्त माहितीनुसार सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल, इत्यादीचे अग्निशामक दलाकडून दि.२६/०६/२०१२ रोजी फायर ऑडिट झाले. २०१२ साली झाले कारण मुंबईच्या मंत्रालयाला त्याच वर्षी भीषण आग लागून अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज जळुन खाक झाले आणि जीवीत तसेच कोट्यावधी रुपयांची न भरुन निघणारी हानी झाली होती.

केंद्र आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि इतर प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाय योजना अधिनियमांतर्गत महानगरपालिका परिक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक इमारतींचे दरवर्षी फायर ऑडिट करणे गरजेचे आहे खासकरून शासकीय इमारतींचे. सदर बाबींची तरतूद न केल्यास दंडात्मक तथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तरतूदी आहेत, पण सदर कायदा प्रशासना मार्फत फक्त सामान्यांचा छळ करण्यासाठी होतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे.असा आरोप त्यानिमित्ताने केला जातोय.

येत्या एक महिन्यात सोलापूर महानगरपालिकेच्या ऐतिहासिक वास्तूचे आणि प्रशासकीय इमारतींचे फायर ऑडिट केले जाईल

पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त

सोलापूर महानगरपालिकेची सद्याची आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमान विषयींची स्वतः इमारतींचा फेरफटका मारला असता आपणास रिकामे आणि अपुरे फायर एस्टींग्युसर,आग लागल्यास काळजी घेणारे सेफ्टी फलक,अग्निचे माहिती देणारे अॉटोमेटेड फायर अलॉर्म सिस्टम इत्यादी आवश्यक गोष्टींचे महानगरपालिकेकडून व्यवस्था केल्याचे निदर्शनास येणार नाही. याचा सरळ अर्थ असा की, सामन्य जनता आणि पालिका कर्मचारी यांच्या जीवाची आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे सोलापूर महानगरपालिका कोणतीही दक्षता घेत नाही.

विजय कुंदन जाधव,अध्यक्ष
गिरिकर्णिका फाऊंडेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here