अखेरीस…1 लाख टेस्टिंगचा टप्पा पार ; कोरोना चाचण्या वाढणं गरजेचं …आज आढळलेले ‘पॉझिटिव्ह’…

0
corona testing

महेश हणमे /9890440480

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर वेगाने वाढत जाणारी संसर्गितांची संख्या चिंताजनक ठरली होती. त्यामुळे कोरोना चाचण्या वाढवणे गरजेचे होते आणि अजूनही आहे. जितके रुग्ण अशा प्रकारच्या चाचणी मधून लवकर निष्पन्न होतील तितक्या लवकर उपचार होतील. पर्यायाने मृत्यूचा दर कमी होईल यासाठी पालकमंत्री,जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी वेळोवेळी टेस्टिंग वाढवण्यासाठी सूचना केल्या होत्या. मात्र हव्या त्या प्रमाणात टेस्टिंग झाल्या नाहीत आज अखेरीस एक लाख 521 जणांची कोरोना तपासणी केली असल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

सोलापूर शहरात आज बुधवारी दि.4 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 16 रुग्ण आढळले असून यामध्ये 12 पुरुष तर 4 स्त्रियांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 24 इतकी आहे. यामध्ये 13 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होतो.

आज बुधवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1160 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1144 निगेटीव्ह तर 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज कोरोनाने एक जणाचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

अशोक नगर,विजापूर रोड परिसरातील 48 वर्षाचे पुरुष 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले होते. उपचारादरम्यान दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्यांचे निधन झाले .त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

बाधित व्यक्ती…
आदित्य नगर विजापूर रोड, सहारा नगर, उमा नगरी मुरारजी पेठ, घोने अपार्टमेंट अशोक चौक, युनिटी आयकॉन जुळे सोलापूर, सहयोग नगर जुळे सोलापूर ,भवानी पेठ ,साईनगर सूत मिलजवळ, पद्मानगर ,कर्णिक नगर ,बापुजी नगर ,सिद्धगंगा हॉस्पिटल जवळ,बाळीवेस या परिसरातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9690 असून एकूण मृतांची संख्या 541 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 418 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8731 इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here