‘या ठिकाणी’ शेतकऱ्यांना मिळावा मतदानाचा अधिकार ; थेट ‘राज्यपालां’कडे मागणी

0
MH13NEWS Network
सोलापूर : महाआघाडी सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीत असलेला शेतकर्‍यांचा मतदानाचा अधिकार काढून घेत त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांना मतदानाचा अधिकार देण्यास शासनास निर्देश करावेत, अशी मागणी माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
       भाजप सरकारने शेतकर्‍यांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्काची बाजार समिती असावी म्हणून त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देत शेतकर्‍यांचा सन्मान केला होता. मात्र महाआघाडी सरकारने केवळ विरोध म्हणून हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय तर झाला आहेत शिवाय त्यांचा अपमानही झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्यास शासनास निर्देश करावेत, असे आ. देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी इंडियन चेंबर ऑङ्ग ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष शिवनाथ बोरसे, उपाध्यक्ष भिमराव पाटील, संचालक सचिव अरुण पाटील, खजिनदार प्रदिप कडलक आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here