मोठी बातमी : अखेर.. शेतकरी कर्जमाफी ,ठाकरे सरकारची मोठी घोषणा

0

MH13NEWS

आत्ताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली.आज विधानसभेच्या अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे.हि कर्जमाफी विना अट असणार आहे असेही यावेळी सांगण्यात आलं.येत्या मार्चपासून याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंत असलेलं दोन लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज माफ केलं जाणार आहे असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीने अक्षरशः मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाही, सात बारा कोरा करायचा शब्द दिला होता याचे काय झाले असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विचारला आणि निषेध व्यक्त करत सभात्याग केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here