‘त्या’ बुरखाधारी टोळीचा पर्दाफाश ; ५ ‘महिले’सह दोघे जेरबंद…

0

MH13NEWS Network

सोलापूर शहर,सांगली कर्नाटक राज्यातील दावणगिरी, बल्लारीसह अशा एकूण 5 गुन्हयांची उकल,7 आरोपींसह 16 लाख 88 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर – मंद्रुप पोलीस ठाणेच्या हद्दीत सराफ दुकानात बुरखा घालुन सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारे 5 महिला व 2 पुरूष असे 7 आरोपी जेरबंद करून 398.19 ग्रॅम सोन्याचे दागिने,गुन्हयात वापरलेली जीप,3 बुरखासह 16 लाख 88 हजार 803 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण ला यश आले आहे.

30 जानेवारी 2020 रोजी  दुपारी 3.00 ते 4.00 वा.दरम्यान 3 बुरखाधारी महिला यांनी सराफाच्या दुकानात प्रवेश करून सराफ दुकानदार याची नजर चुकवुन डब्यात ठेवलेेले 3 लाख 85 हजार रूपये किंमतीचे 11 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेली म्हणुन सराफ दुकानदार अशोक महादेव पत्तार (वय 41 रा.मंद्रुप ता.द.सोलापूर ) यांनी मंद्रुप पोलीस ठाणेस दिलेल्या फिर्यादी वरून मंद्रुप पोलीस ठाणेस चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मनोज पाटील,पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस निरीक्षक अरूण सावंत यांचे नेतृत्वाखाली गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे मागावर स्थानिक गुन्हे शाखे कडील अधिकारी व कर्मचारी याचे पथक कार्यरत होते.

1 मार्च 2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी हे मंद्रुप पोलीस ठाणेच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमी कळाली. मंद्रुप पोलीस ठाणेच्या नमूद गुन्हयातील संशयित बुरखाधारी महिला व पुरूष आरोपी हे जीप क्रमांक डभ्.25.।.3041 ने चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यासह कर्नाटक राज्यातुन विजापूर मार्गे सोलापूर येथे येणार आहेत. मिळालेल्या बातमी प्रमाणे स्थागुशा कडील अधिकारी व कर्मचारी हे विजापूरहुन सोलापुर कडे येणा-या मार्गावर बातमीतील जीपची वाट पाहत तेरा मैल येथे थांबले होते. दरम्यान सदरचे गामा जीप तेरा मैल येथे आले नंतर जीपचे चालकास वाहन थांबविणेच्या इशारा केला असता त्या जीपच्या चालकाने जीप न थांबविता तसाच पुढे घेऊन गेला. तेंव्हा पोलीसांनी त्या जीपचा पाठलाग करून त्यास पकडुन त्या जीप चालकाचे नाव, गाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव

1) शशिकांत राजेंद्र जाधव (वय 30 रा.रामवाडी धोंडीबा वस्ती, सोलापूर ) असे सांगितले. सदर जीपची  तपासणी करता जीप मध्ये एकूण 5 महिला व 1 पुरूश इसम बसलेले दिसुन आले. जीप मध्ये असलेल्या महिला व पुरूश इसमाचे नाव गाव, पत्ता विचारता त्यांनी आपली नावे (2) गौराबाई बब्रुवान जाधव (वय 50) (3) संगीता शेखर जाधव (वय 40) (4) शकुंतला उर्फ शेकम्मा राजु गायकवाड (वय 45) (5) राणी उर्फ राजेश्वरी अजय गायकवाड (वय 25) (सर्व रा.रामवाडी धोंडीबा वस्ती सोलापूर) असे सांगितले (6) अरविंद यादगिरी जाधव (वय 30) (7) ज्योस्ना अरविंद जाधव (वय 26) (दोघे रा.सितारामबाग इंदिरानगर, हैद्राबाद ) असे असल्याचे सांगितलं.

जीपचे मध्ये मिळुन आलेल्या महिला, पुरूष व जीप चालक याचेकडे मंद्रुप पोलीस ठाणेच्या हद्दीत सराफ दुकानाच्या चोरीच्या गुन्हयाच्या बाबतीत विचारपूस केली असता त्या सर्वानी सुरूवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली. तेंव्हा त्या सर्वांना अधिक विश्वासात विचारपूस करता जीप मध्ये बसलेल्या संशयित महिला व पुरूष यांनी सांगितले की, आमचे पैकी 3 महिला बुरखा घालुन मंद्रूप येथील सराफाच्या दुकानात गेले होते. आमचे सोबत असलेले इतरांनी महिला व पुरूष यांनी सराफ दुकानदार यांना चांदीचे जोडवे खरेदी करण्याच्या बहाणा करून सराफाच्या दुकानात खुर्चीवर बसले होते. तेव्हा सराफ दुकानदार हे चांदीचे जोडवे दाखवत असताना सराफ दुकान यांनी त्याचे काऊंटरवर विक्री करीता ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्याच्या पांढ-या रंगाचा प्लॅस्टीक बाॅक्स दुकानदार नजर चुकवुन तो उचलुन घेतला होता. त्यानंतर आम्ही सर्वजण जीपने सातारा, सांगली, पुणे व कर्नाटक राज्यात गेलो होतो असे सांगुन मंद्रुप येथील सराफ दुकानातुन चोरलेले सोन्याच्या दागिने आमचेकडे असल्याचे सांगुन गुन्हयाची कबुली दिली आहे.

खालील नमूद संशयित आरोपी यांना दिनांक 1 मार्च 2020 रोजी अटक केली आहे.वरील नमूद संशयित महिला व पुरूष याचे ताब्यातुन 398.19 ग्रॅम  14 लाख 53 हजार 393 रूपये किंमतीचे कानातील बाळी, बाळ अंगठया,गळयातील बदाम,लटकन, खांडके, पालाडी, उडके, बुगडी, मोरणी, बटनटाप्स्, प्लेट्स, श्रीदेवी नथ व सोन्याचा चुरा अशा वर्णनाचे सोन्याचे दागिने व 2 लाख 35 हजार रूपये किंमतीची जीप व 3 बुरखे तसेच कर्नाटक राज्यातुन चोरी गेलेले 16 सोन्याची चैन असा एकूण 16 लाख 88 हजार 803 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर आरोपी यांनी सराफ दुकानात बुरखे घालुन सराफ दुकानदार याची नजर चुकवुन सोलापूर शहरातील विजापूर नाका,मिरज,  कर्नाटक राज्यात बल्लारी, चनगिरी जि.दावणगिरी अशा पोलीस ठाणेच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. त्याचेकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत आवटे, सपोफौ/अशोक ढवळे, पोहवा/ख्याज्या मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, दिलीप राऊत, पोना/रवि माने, मपोना/अनिसा शेख व चापोकाॅ/राहुल सुरवसे यांनी बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here