सोलापुरात निर्यात विषयक प्रशिक्षण कार्यक्रम

0

केन्द्र सरकारच्या अखत्यारीतील निर्यातवाढीसाठी प्रयत्न करणार्‍या फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स या यंत्रणेतर्फे सोलापुरातून तयार कपडे, डाळींब, चादरी आणि टेरी टॉवेल्स यांची निर्यात वाढीस प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सोलापूरच्या बालाजी सरोवर हॉटेल येथे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत निर्यातदारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
फेडरेशनने सोलापूर जिल्ह्याची निवड निर्यात क्षेत्र म्हणून केली असून या जिल्ह्यातून परदेशी निर्यात कशी वाढवता येईल यावर लक्ष केन्द्रित केले आहे. सोलापुरातून चादरी आणि टॉवेल तसेच तयार कपडे आणि डाळिंबांची निर्यात वाढवता येईल असे या फेडरेशनला लक्षात आले असल्याने या मालाची निर्यात करणार्‍यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला निर्यात क्षमता वाढ कार्यक्रम असे नाव असून त्यात सोलापुरातील उद्योग वाढीची क्षमता, चादर, टॉवेल, तयार कपडे आणि डाळींब यांच्या निर्यातीला असलेली संधी, निर्यात वाढीत फेडरेशनची भूमिका आणि निर्यात उद्योगाची सुरूवात आणि व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, डाळींब संशोधन केन्द्राचे संचालक डॉ. आर. ए. मराठे, सोलापूर गारमेंट असो.चे संचालक अमितकुमार जैन, डाळींब संशोधन केन्द्राचे संचालक नीलेश गायकवाड आणि  मिहीर शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन,सोलापूर जिल्हा उद्योग केंद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन आदींचे सहकार्य लाभले आहे.
बुधवार 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 4 पर्यंत असणाऱ्या या कार्यक्रमात ऑनलाईन सामील होण्यासाठी झूम लिंक खालील प्रमाणे आहे.

https://bit.ly/SOLAPUR
आयडी : 812 2950 4388,
पासवर्ड कोड : 904690

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन चे
अंकित देवळेकर व अक्षय शहा यांनी ही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here