फ्रेंड्स ‘ढाब्या’वरची दारू पडली महागात ; ६ मद्यपींसह हॉटेल चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

0

ढाब्यावर दारू पिणे पडले महागात
६ मद्यपींसह हॉटेल फ्रेंड्स चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

न्यायालयाने ठोठावला ३७ हजारांचा दंड
सोलापूर शहरातील होटेल ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच असून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शहरातील मजरेवाडी होटगी रोडवरील हॉटेल फ्रेंड्स या ठिकाणी धाड टाकून ढाबा चालकासह त्या ठिकाणी दारु पितांना आढळून आलेल्या ६ मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक ३ मार्च शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने मजरेवाडी होटगी रोडवरील रेल्वे रुळाशेजारील हॉटेल फ्रेंड्समध्ये धाड टाकून होटेल चालक प्रणय कल्लाप्पा जमादार, वय ३२ वर्षे, राहणार सैफुल सोलापूर याच्यासह मद्यपी ग्राहक पांडुरंग विठ्ठल माने , गणेश दिलीप पुकाळे , आदित्य युवराज चंदनशिवे, म्हाळसाकांत मोहन पवार, श्रीकांत दत्तात्रय पाटील व अंकुश तुकाराम वरवटे यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १८० मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या दोन बाटल्या, मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्की च्या दोन बाटल्या, कार्लबर्ग्स स्ट्रॉंग बियर बाटल्या व १४ प्लास्टीक ग्लास असा एकूण एक हजार चारशे दहा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (अ) (ब) व ८४ नुसार गुन्हा दाखल करुन गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी ४ मार्च रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले असता श्रीमती नम्रता बिरादार, न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय,सोलापूर यांनी तात्काळ निकाल देत ढाबाचालकाला रू. २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. दोन हजार असा एकूण सदोतीस हजारांचा दंड ठोठावला आहे.

 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संभाजी फडतरे, सुनील कदम, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, सुनील पाटील , सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, जवान प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन..


होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्याच्या सीमेवर गस्त घालण्यात येत असून परराज्यातील दारूच्या वाहतुकीवर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे, तसेच हातभट्टी दारू व ढाब्यांवरही सातत्याने कारवाई केली जात आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अवैध दारूबाबत तक्रार असल्यास या विभागाला त्याची माहिती द्यावी-

नितिन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here