‘प्रतिबंधित’ कुर्बान हुसेन नगर मधील लोकांचा उद्रेक ; मास्तरांची शिष्टाई

0

MH13 NEWS NETWORK

सोलापुरात कोरोनाचा कहर वाढत आहे .शहरातील बरेच भाग सील करण्यात आलेले आहेत . प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेल्या कुर्बान हुसेन नगर येथे जीवनावश्यक वस्तू आणि सुविधा मिळत नसल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिकांनी केली. याची दखल प्रशासन घेत नसल्याने या प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांचा उद्रेक झाला.खाजगी दवाखान्यात उपचार होत नाहीत अशी तक्रार होती. त्यातच आज शुक्रवारी एका व्यक्तीला त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण ही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रातील असल्याचे सांगत उपचार करण्यास नकार दिला. यातच या व्यक्तीचा मृत्यू झाला असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. ही बातमी  पसरताच संतप्त झालेल्या लोकांनी सोशल डिस्टन्स आणि इतर सारी बंधने झुगारून रस्त्यावर आली. अखेर आडम मास्तर यांनी शिष्टाई करून वातावरण शांत केलं.या वेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 वाजता कुर्बान हुसेन नगर झोपडपट्टी येथील एक नागरिकाचा खाजगी डॉक्टरांच्या हेतुपुरस्सर दुर्लक्ष आणि उपचार करण्यास नकार दिल्याने मृत्यू झाला.यामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले असता ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वातावरण आटोक्यात आणले. यावेळी या परिसरातील दाऊद शेख आणि माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांनी त्या भागातील नागरिकांच्या समस्या सदर बाजार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे आणि आडम मास्तर यांच्या पुढे मांडली

यावर आडम मास्तर यांनी याची सविस्तर माहिती प्रशासनाला देऊन सोमपा आयुक्त तावरे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना ईमेल मार्फत निवेदन पाठवून दिलय .

कोविड 19 कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. मात्र काही भागात यंत्रणा मार्फत नियोजनात दोष आहेत अशी नागरिकांची तक्रार असल्याची भावना व्यक्त होत आहे. सदर कुर्बान हुसेन नगर झोपडपट्टी हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून संपूर्ण परिसर बंदिस्त केले.त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, दैनंदिन गरजा, औषधे, बँक सेवा उपलब्ध होणे कठीण झाले.
या भागात केवळ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा च्या धास्तीने जवळपास 10 व्यक्ती दगावले. या व्यक्तींना खाजगी दवाखाण्यात दाखल करून घेरले नाहीत. कुर्बान हुसेन नगर परिसरात राहणारी व्यक्ती म्हटले की, कोणतेही डॉक्टर उपचार करायला तयार नाहीत. तातडीने खाजगी दवाखाने उघडून लोकांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून घ्यावे.बँकांचे फिरते ATM ची व्यवस्था करण्यात यावी.मधुमेह, कर्करोग, रक्तदाब तसेच गंभीर व दुर्धर आजार जडलेल्या रुग्णांना प्राधान्याने सेवा मिळावी. अशी मागणी या निवेदनात केली आहे.

या परिसरातील रुग्ण बरे होऊन घरी परतले असून प्रतिबंधित क्षेत्र आहे त्या स्थितीत आहे. मात्र याबाबत हरकत नसून नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा आणि श्री मार्कंडेय रुग्णालय,अपेक्स,नर्मदा,अश्विनी, यशोधरा,युनिक, गंगामाई ही सहकारी रुग्णालये आणि खाजगी दवाखाने तातडीने सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्याची मागणी या वेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here