विमान रे…! सोलापूरकरांवर लादलेला आर्थिक दहशतवाद संपवा…

0

सोलापूरातील नामांकित शाळा आणि महाविद्यालयाचे संचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विकास मंचच्या उपोषणाला वाढतोय पाठिंबा

एका संस्था चालकाच्या हट्टीपणामुळे शहराची प्रगती खुंटत असेल तर तो एकप्रकारे सोलापूरकरांवर लादलेला आर्थिक दहशतवाद असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोलापूर विकास मंचच्या वतीने आयोजित होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा होई पर्यंत चक्री उपोषणाच्या चौदाव्या दिवशी नागरिक व्यक्त करत आहेत. शिक्षक म्हणून आमचे विद्यार्थी आणि पालक म्हणून आमचे पाल्य सोलापूरातच राहुन सोलापूरचे नावलौकिक मिळवण्यासाठी आम्ही त्यांच्यावर अश्या पद्धतीचे संस्कार करत आहोत, निस्वार्थ भावने सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांना नक्की यश मिळाले असा आशावाद सोलापूरातील नामांकित शाळा आणि महाविद्यालयाचे संचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचानी व्यक्त करत आहेत.

सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषणाला समर्थन देण्यासाठी चौदाव्या दिवशी क्रेडाई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील फुरडे, सोलापूर शहर अध्यक्ष दोड्डीमणी, अभय सुराणा, पद्मशाली शिक्षण संस्थेच्या ए.आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, रामकृष्ण बेत रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण, राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळा, रामदास नरसय्या इप्पाकायल प्राथमिक शाळा, सौ.भूदेवीबाई मल्ल्या पुल्ली कन्या प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय, नारायणराव कुचन प्राथमिक शाळा, मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशाला, रामव्वाबाई रामय्या बुर्ला प्राथमिक शाळा, दुबय्या राजण्णा श्रीराम इंग्लिश मिडियम स्कुल, सोशल शाळा आणि महाविद्यालय, डॉ. मिलिंद पाटील,व्यवसथापक दयासागर हंचाटे, आदी संस्था, संघटना आणि व्यक्ती यांनी चक्री उपोषणासाठी सक्रिय पाठिंबा दर्शविला.

सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई घर आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात काळे झेंडे लावण्याच्या आवाहनाला सोलापूरकर भरभरून प्रतिसाद देत आहेत. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, विलास शहा, योगीन गुर्जर, प्रसन्न नाझरे, आनंद पाटील, सुहास भोसले, मनोज क्षीरसागर, श्रीकांत बनसोडे, सुर्यकांत पारेकर, सुरजसिंग राजपूत, अॅड. दत्तात्रय अंबुरे, अॅड. प्रमोद शहा, गणेश शिलेदार, रमेश खुने, इक्बाल हुंडेकरी, अर्जुन रामगिर, राजेंद्र चव्हाण, प्रतिक खंडागळे, यशवंत बोधे, सहदेव इप्पलपल्ली, विजय कुंदन जाधव आदी सदस्य उपस्थित होते. उपोषणस्थळी सुरू असलेल्या सह्यांच्या मोहिमेस सोलापूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे, आज पर्यंत एकुण ११,४२२ जणांनी अॉनलाईन, प्रत्यक्ष उपोषणस्थळी आणि चौदाव्या दिवशीच्या सह्यांच्या मोहिमेस ४६७ सोलापूरकरांनी सह्या करुन होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस सुरू होऊ पर्यंतच्या चक्री उपोषणासाठी पाठिंबा दर्शविला आणि अॉनलाईन पद्धतीने देश विदेशातुन आजपर्यंत ५०२३ जणांनी देशा विदेशातुन पाठिंबा दर्शविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here