वीजदर सवलत | यंत्रमागधारकांना अर्ज करण्यास ‘मुदतवाढ’

0
वीज

सोलापूर,दि.22: वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमागधारकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उप आयुक्त चंद्रकांत टिकोळे यांनी दिली आहे.

राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना 21 डिसेंबर 2018 अन्वये वीजदर सवलत लागू केली आहे. वीजदर सवलतीला पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https:www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक होते. मात्र यंत्रमाग घटकांनी नोंदणी केलेली नसल्याने 27 अश्वशक्तीपेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांनी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन श्री. टिकोळे यांनी केले आहे.

मुदतवाढीमध्ये संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज सादर न केल्यास वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असेही श्री. टिकोळे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here