‘ईद-उल-अजहा’ बकरी ईद शनिवारी ; नमाज घरातच अदा करा-शहर काझी

0

ईद -उल -अजहा म्हणजेच बकरी ईद 1 ऑगस्ट शनिवारी होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे ईदची नमाज ईदगाह मैदानावर होणार नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज  ईदची नमाज आप आपल्या घरातच अदा करावी, नमाज नंतर कुर्बानी द्यावी असे आवाहन सोलापूरचे शहर काझी अब्दूर राफे यांनी केले.

बकरी ईद निमित्त सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये पोलिस प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे  प्रशासनाच्या सूचना पालन करावे. जनावरे ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीद्वारे नोंदणी करुन खरेदी करावीत. एक किंवा तीन बकरे इतर जिल्ह्यातुन आणन्यासाठी परवानगी आहे. तसेच कोरोनाच्या संकटामुळे बकरी ईदची नमाज ईदगाह मैदानाावर होणार नाही. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी नमाज घरातच अदा करावी. सूर्योदयानंतर दुपारी साडेबारापर्यंतच्या वेळेत नमाज अदा करावी, ईदच्या नमाज नंतर  कुर्बानी द्यावी, कुर्बानी दिल्यानंतर स्वच्छता ठेवा, शहरात कुठेही कचरा टाकून  घाण करू नका , घंटा गाडी आल्यानंतर कचरा टाकावे,  बाहेर येऊन गर्दी करू नये, सामूहिक गर्दी करू नये,  शांत, संयमाने ईद साजरी  करा असे  आवाहन शहर काझी यांनी केले आहे.

बकरी ईदची नमाज घरीच अदा करावी: जिल्हा प्रशासनाचे आवाहन

कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यानुसार नागरिकांनी बकरी ईद नमाज घरीच अदा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. जनावरे ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीद्वारे नोंदणी करुन खरेदी करावीत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here