अद्भुत | देवतारी त्याला कोण मारी; छातीचे स्नायू कट,फुफ्फूस पडलं बंद, हृदयाचे ठोके उघड्या डोळ्याने…

0

महेश हणमे,9890440480

म्हणतात ना देव पाठीशी असेल तर कोणतेही संकट सहज तरुन जाऊ शकते. असाच अद्भुत प्रत्यय सोलापुरात आला. शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर विजय अंधारे यांच्या हाताला पुन्हा एकदा यश आलं आहे. त्यामुळे एका अल्पवयीन मुलाचा जीव वाचला.
हकीकत अशी की…

डॉ. विजय अंधारे, हृदय फुफ्फुस शल्य विशारद यांच्याकडे दिनांक 21 मार्च 2021 रोजी देविचामाळ करमाळा येथील एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आला .एका फँक्टरी मध्ये त्या 14 वर्षाच्य‍ा मुलाचा कन्वेअर बेल्टमध्ये अडकून अनावधाने अपघात झाला, हा अपघात ऐवढा मोठा होता की, मुलाची पूर्ण डावी छाती कट झाली, आणि छाती कट झाल्यानंतर दिसणारे दृश्य अत्यंत विदारक होते.पेशंटचे फुफ्फूस बंद अवस्थेत उघडे पडले होते, छातीतील सर्व स्नायू कट झालेले होते, आणि आत असलेले ह्रदयही पंप होत असताना, किंवा ठोके पडत असताना उघड्या डोळ्याने दिसत होते, हा पेशंट अत्यंत serious condition मध्ये cns हाँस्पीटल ठिकाणी अत्यावशक विभागामध्ये प्राथमिक उपचार श्वास घेता येत नसल्याने श्वासाची नळी टाकुन तत्परतेने हा पेशंट मार्कडेय रुग्णालय मध्ये डॉ. विजय अंधारे यांच्याकडे (कार्डीयो थोरसिक सर्जन) हृदय फुफ्फुस शल्य विशारद यांच्या कडे इमर्जन्सी आला.

, या पेशंटला दुपारी १ ते १ : ३० च्या सुमारास सर्व ऑपरेशनची टीम तयार करून लगेच जसा पेशंट मार्कडेय रुग्णालय मध्ये आला तसा डायरेक्ट हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये शिफ्ट करण्यात आला, आणि ऑपरेशन थिअटर मधे / शस्त्रक्रिया विभागामध्ये घेण्यात आला, पेशंट ज्या वेळेस रुग्णालय मध्ये पोहचला होता, बेशुद्धावस्थेत होता, त्याच्या तोंडामध्ये श्वासाची नळी टाकली होती, व्हेन्टीलेटरला पेशंट जोडुन भूलेखाली जखमेची पूर्ण तपासणी केली गेली , आणि ऑपरेशनसाठी तयारी केली, पेशंट च्या छातीमध्ये फुफ्फुस बंद पडले होते, ते व्हेन्टीलेट करून फुगवण्यात आले,फुफ्फुसातून जि हवा लिक होते ती बंद करण्यात आली, हृदयाचे आवरण दिसत होते, हृदयाच्या ज्या नसा असतात त्याही सगळ्या उघड्या पडलेल्या होत्या, आणि त्याचे छोटे छोटे फांद्या होत्या त्यातुन रक्त जात होते ते सर्व बंद करण्यात आले, त्यानंतर छातीची हाडे मोडली होती ती एकमेकांच्या जवळ आणून फिक्स करण्यात आली, आणि त्याच्या वर स्नायू बंद करण्यात आले, स्नायू सगळे उघडे पडल्यामुळे माती, धूळ जाऊन ते खूपच खराब झाले होते, काही स्नायू काळे पडले होते, ते सगळे स्नायू स्वच्छ करून, ज्या स्नायू चा जीव गेला होता ते स्नायू कट करून बाकीचे हृदय आणि फुफ्फुसावर कव्हर करण्यात आले Reconstruction किंवा छाती बंद करण्यात आली, अत्यंत अत्यावस्थ असलेला हा पेशंट ज्याला श्वास घ्यायला हि खूप त्रास होता.

ऑपरेशन नंतर

 

तो पेशंट ऑपरेशननंतर १ तासामध्ये शुद्धीवर आला, आणि त्याच्या तोंडातून श्वासाची नळी काढून तो स्वतः पेशंट पूर्णपणे श्वास घेऊ लागला, २ दिवसानंतर पेशंट ICU मधून जनरल विभागा मध्ये शिफ्ट करण्यात आला असून पेशंट आता व्यवस्थित कंडीशन मध्ये आहे .या ऑपरेशनला भुल तज्ञ मंजुनाथ डफळे तसेच सहकारी ममता मुंगापाटिल , मुबिना शेख, नजमा शेख, केशव मेरगु, बालक्रिश्ना कोटा, दिव्या मडता, सुमित माने, नागमनी मडता यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. अंधारे यांना जीवदान देणारा हाच खरा माझा देव अशी भावना व्यक्त केली आहे.

अपघात अत्यंत दुर्दैवी होता. यामध्ये करण पवार अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल झाला होता. यावेळी त्याचा जीव वाचवणे ही मोठी कसोटी होती. परंतु ईश्वर कृपेने आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या श्रमामुळे करण चा जीव वाचला. याचे मोठे समाधान मला आणि माझ्या टीमला आहे.

डॉ .विजय अंधारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here