राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षपदी डाॅ. प्रतिक्षा चव्हाण

0

राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षपदी डाॅ. प्रतिक्षा चव्हाण

राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कु.सक्षणाताई सलगर यांच्या मान्यतेने सोलापूरच्या शहर अध्यक्षपदी डॉ.प्रतीक्षा चव्हाण यांची निवड जाहीर करण्यात आली व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आल्या निमित्त आज रोजी त्यांचे स्वागत व सत्कार कार्यालयात शहराध्यक्ष श्री.भारत जाधव यांच्या प्रमुख हस्ते प्रदेश सचिव संतोषभाऊ पवार, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, महिला कार्याध्यक्ष लता ढेरे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, विद्यार्थी शहराध्यक्ष निशांत सावळे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, युवक पदाधिकारी आशिष बसवंती, सागर भोसले आदींच्या उपस्थितीत करण्यात आला व युवती संघटना मजबूत करून राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे साठी पक्ष कायम सोबत असल्याचे सगळ्यांनी सांगत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना नूतन युवती अध्यक्ष डॉ.प्रतीक्षा यांनी आधीपासूनच राष्ट्रवादी मध्ये काम करत असल्यामुळे तसेच संसद रत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या सारख्या मार्गदर्शिका कायम सोबत असल्याने आणि युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणा ताई सलगर यांची खंबीर साथ, नेतृत्व मला युवती संघटन अजून मजबूत करून शहरातील जास्तीत जास्त युवती राष्ट्रवादी सोबत कश्या जोडता येतील ह्यावर प्रामुख्याने माझा भर असल्याचे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here