डॉक्टरच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या कंपाउंडरासह इतर ताब्यात

माळशिरस ग्रामीण व सायबर पोलिसांची यशस्वी कारवाई

0

(वेब/टीम )

सोलापुरातील माळशिरस येथील डॉ. नितीन सिद यांच्या सहा वर्षीय ईशानचे २० लाख खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते, मात्र ग्रामीण पोलिसांनी सायबर खात्याच्या मदतीने तातडीने कारवाई करून मुलाची सुखरूप सुटका केली. तसेच कंपाउंडरसह सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अपहरण करणाऱ्या आरोपींपैकी स्वप्नील नवनाथ नाईकनवरे हा डॉ. नितीन सिद यांच्या रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करीत होता. ईशानला दररोज शिकवणीला सोडणे व परत घरी आणणे हे त्याचे काम होते. परंतु शनिवारी दिनांक 24 रोजी नाईकनवरे याने त्याच्या मित्राच्या मदतीने मुलाच्या अपहरणाची योजना आखली. त्याच दिवशी दुपारी चार वाजता नाईकनवरे ईशानला घेऊन बीएसएनएलच्या कार्यालयासमोर गेला. त्याच वेळेस प्लॅनप्रमाणे प्लॅनप्रमाणे नाईकनवरेसह इतर सहा जणांनी ईशानचे अपहरण केले. त्यापैकी एकाने, ‘मुलगा जिवंत पाहिजे असल्यास रात्री बारा वाजेपर्यंत वीस लाख रुपये घेऊन या’ असा निरोप दिला

बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. ग्रामीण पोलिसांनी सायबर च्या मदतीने तपासासाठी तत्परतेने कारवाई केली.पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी सहा. पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंजुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उबाळे, पोलीस नाईक कांबळे, पोलीस नाईक औटी यांच्या पथकाने  ईशानचा शोध घेऊन त्याला रात्री ११ वा माळशिरस पोलीस ठाण्यात सुखरूप आणुन आई वडिलांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाही आरोपींना अटक केली आहे.वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या चिमुकल्या जीवाला पोलिसांनी सुखरूप सोडवल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here