दानत…आभाळाएवढं मन ; टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!

0

कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र कोरोनाला पळवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी समाजातले दानशूर देखील पुढे येऊ लागले आहेत. आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांनी आत्तापर्यंतची सर्वांत मोठी मदत केली आहे. आधी 500 कोटींची मदत त्यांनी जाहीर केली होती. मात्र आता आणखी 1 हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. रतन टाटांनी आतापर्यंत दीड हजार कोटींची मदत केली आहे.

कोरोना आजारामुळं सध्याची भारतातील आणि जगाची परिस्थिती ही खूपच वाईट झाली आहे. त्यासाठी आपल्याकडून सर्वात चांगली कृती करण्याची हीच वेळ आहे, असं म्हणत टाटा ग्रुपने आणखी 1 हजार कोटी रूपये मदत म्हणून देत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here