दिवाळी पाडवा ; सोलापुरात दीपोत्सव

0

कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळीचा दुसरा दिवस पाडवा. या दिवशी बळीची पूजा करतात. सोलापूर शहर व जिल्हा परिसरामध्ये दिवाळीचा पाडवा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे .काल सायंकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वच्छ धुऊन,तर अनेक खाजगी संस्थांची कार्यालये सुशोभित करून दिवाळी पाडवा पूजनाची तयारी मोठ्या उत्साहात केली आहे. यंदाच्या वेळी फटाके उडविण्याचे प्रमाण अल्प आहे परंतु दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे.

या दिवशी विक्रम सवस्तर या कालगणनेच्या नव वर्षाचा प्रारंभ होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य यानं शकांचं आक्रमण परतवून लावलं, त्यांचा पाडाव केला, त्या विजयाचं प्रतीक म्हणून विक्रमदित्यानं विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली.

हा दिवस साजरा करण्याची पद्धत

वर्षांतील साडेतीन मुहूर्तापैकी हा दिवस अर्ध्या मुहूर्ताचा समजला जातो म्हणून नव्या उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ असल्याचे मानले आहे.

या दिवशी गोवर्धनाची पूजा करतात. काही लोकं शेणाचा पर्वत करून, श्रीकृष्ण, इंद्र, गायी- वासरे यांची चित्रे मांडून त्यांची पूजा करतात. गवळी आपल्या गायींना सजवून मिरवतात.

प्रतिपदा नर्ववर्षाची सुरुवात मानून व्यापारी वही पूजन करतात.

मुली- स्त्रिया तेल- उटणे लावून आपल्या वडिलांना आणि पतीला स्नान करवतात. नंतर त्यांना ओवाळतात.

आणखीन जाणून घ्या…

दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले.

याच दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होतो. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतो. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.

दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल,अक्षता वाहून त्यांची पूजा होते.

संकलन – प्रसाद दिवाणजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here