दिव्या राका यांनी जिंकला ‘सुपरमॉम’चा मुकूट

0

युनिक ब्लॉसम किड्स कॉम्पिटिशन उत्साहात साजरे

सोलापूर:- युनिक ब्लॉसम प्रीस्कूल तर्फे सोलापुरात प्रथमच नवजात बालक ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे सुपरमॉम ही  अनोखी स्पर्धा देखील घेण्यात आली होती या स्पर्धेत दिव्या राका यांनी सुपर मॉम चा मुकुट पटकावला,ही स्पर्धा 8 फेब्रुवारी 2020 रोजी शांतीसागर मंगल कार्यालय येथे घेण्यात आली होती.

यावेळी बेबी किंग, बेबी क्वीन, माय प्राईड बेबी, आणि क्यूट बेबी फोटोग्राफी अशा विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते. या स्पर्धेत मध्ये सुमारे  120 बालकांनी व मातांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व प्रसिद्ध बाल संगोपन तज्ञ सौ.अलका काकडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली होती. यास्पर्धासाठी डाँ. सुनील वैद्य, रिद्धी जोशी,राकेश सोनी, आनंद चव्हाण ,डॉ. सुनील वैद्य डॉ. नीलिमा हरी संगम यांनी परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली.

युनिक ब्लॉसम प्रीस्कूल तर्फे घेण्यात आलेल्या या वैविध्यपूर्ण स्पर्धेत बालक व त्यांच्या मातांनी अत्यंत उत्साहपूर्ण रीतीने सहभाग नोंदवला व  स्पर्धेचा आनंद घेतला. या स्पर्धेतून बालकांचे संगोपन, जबाबदार पालकत्व ,सकारात्मक दृष्टिकोन आदी घटकांना विशेष महत्त्व देण्यात आले होते. विजेत्यांना सुमारे 50 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली होती.या प्रसंगी डॉ. यतीन जोग, सराफ  व्यवसायिक भीमाशंकर करजगीकर यांच्यासह बालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसिद्ध बालसंगोपन तज्ञ सौ अलका काकडे यांनी याप्रसंगी उपस्थित समुदायाला पालकत्व या विषयावर  मार्गदर्शन केले, त्या म्हणाल्या पूर्व प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या जडणघडणीतील पाया असतो, बालकांच्या गुणांचा उल्लेख पालकांनी त्यांच्या समोर केला पाहिजे ,त्यांच्यातील दोष सांगण्यापेक्षा सकारात्मक बाजू त्यांच्यासमोर मांडल्यास जडणघडण अधिक सुकर होईल असेही त्यानी सांगितले.  कुलगुरू डॉ.फडणवीस यांनी युनिक ब्लॉसम प्री स्कूलच्या विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती व बाल विद्यार्थ्यांची मानसिकता यावर आधारित  शैक्षणिक तंत्रज्ञानाचे विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे एक चांगला नागरिक घडण्यासाठी  विद्यार्थ्यांवर संस्कार हे पूर्वप्राथमिक शिक्षणापासून सुरू होते असेही त्यानी या वेळी सांगितले.

युनिक ब्लॉसम प्रीस्कूल च्या संस्थापिका सौ.गौरी यतीन जोग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्याचप्रमाणे युनिक ब्लॉसम च्या अत्याधुनिक व जागतिक स्तरावरील शिक्षण पद्धतीवर आपले विचार मांडले.या कार्यक्रमासाठि स्वाती देशपांडे, चारु वडजे, अश्विनी कुलकर्णी,यंबळ  यांचे सहकार्य लाभले.

*चौकट*

विविध स्पर्धेतील विजेते

*सुपर मॉम*

दिव्या राका,

नेहा जाजू

नीलम खंडेलवाल

बेबी किंग

सृजन वाघमारे

शिवांश ताक्कल्कोटे

विहान शिंदे

बेबी क्विन

समायरा रघोजी

सान्निध्दी यंमबल

रित धरमसी

नव्या भट्टड

*क्यूट बेबी फोटोग्राफ*

सृजन वाघमारे

शौर्य साल्लकी

अयान राठी

*माय प्राइड  ऍक्टिव्ह बेबी*

अनिका कोनापुरे

तपस्या कोंडा

*टॉलेस्ट बेबी*

जीवन गड्डम

सानवी दासरी

वृष्टी राका

नारायण शिंदे

*सुमो बेबी*

हरप्रीत देवसानी

रुद्रांश गोवडे

राजवीर मंदृपकर

सानवी दासरी

वृष्टी राका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here