दिव्यांगांना 75 पांढऱ्या काठीचे वितरण ;काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचा उपक्रम

0

काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड च्या वतीने( दिव्यांग )अंधांना मोफत 75 काठी चे वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला

MH13 News Network
सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड च्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या हस्ते शहरातील गरजू अंध बांधवांना मोफत 75 दिशादर्शक काठीचे वाटप नुकतेच करण्यात आले.
जोडभावी पेठ येथील कांचन फौंडेशनच्या कार्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अनिल हलकट्टी, नूरअहमद नालवार, अक्षय हलकट्टी, रविकांत पाटील, रजाक कादरी,नागेश शहापूरे, कल्याणराव चौधरी, मल्‍लीकार्जून पाटील, सूरज कोरे, नितीन हलसगी, आदी उपस्थित होते.
या वेळी महानंदा चिलवंत, सुभाष समर्थ, गिरीश ढोले, नितीन करडे,झानेश्वर काटेकर,सचिन चलवादी,शिवराज चलवादी आदी सह अंध बांधव उपस्थित होते.

 

गरजू अंध बांधवांची गरज पाहून सुदीप चाकोते यांनी त्यांना काठीच्या रुपात नवी दृष्टीच दिली असल्याची भावना यावेळी अंध बांधवांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here