आपल्या सोलापुरात आली डिजिटल ‘सहेली’ ; वाचा सविस्तर

0

MH13 News Network

सोलापूर : सुमेध फाउंडेशन, सोलापुर व विधा फाउंडेशन, सोलापुर आणि भारतीय डाक विभाग प्रधान कार्यालय, सोलापुर यांच्या संयुक्त विघमाने आयोजित केलेल्या “डिजिटल सहेली” महिला सक्षमीकरण अभिनव कार्यशाळेचे उद्गधाटन महाराष्र्टाच्या जलकन्या भक्ती जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास जनसंपर्क निरीक्षक महेशकुमार पल्लेवाड, वनविभाग मुख्य लेखापाल संध्याराणी बंडगर, भक्ती बचतगटाच्या उमा देगीनाळ, नील शाळा संचालिका सीमा अंजुटगी, हेमंत निबंर्गी, रेगोटे सर, योगीन गुर्जर, युक्ता माखीजा, मालाश्री हिरेमठ,धनश्री दिवेकर, सुष्टी जाधव, तसेच वीस वर्षाच्या तरुणी ते पंचावन वर्षाच्या महिलां पर्यंत प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


डिजिटल सहेली हा उपक्रम शनिवार व सोमवार या दोन दिवसात होणार आहे. या कार्यशाळेतील प्रशिक्षाणार्थींना संपुर्ण डिजिटल प्रशिक्षण प्रशिक्षक विघा फाउंडेशन अध्यक्ष अमित कामतकर व डाक सहाय्यक अनंत होंडरे यांच्या कडून देण्यात येत आहे.

 

महिलांनी आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे येवून डिजिटल सहेली या उपक्रमातुन डिजिटल तंत्रज्ञान आत्मसाथ करून आत्मनिर्भरतेने आपल्या रोजच्या जीवनात प्रगती करावे असे आवाहन भक्ती जाधव यांनी केले.

आपल्या हातातल्या मोबाईल मध्ये एक उपयुक्त ऍपचा वापर करुन डिजिटल तंत्रज्ञाना आधारे दैनंदिन जीवनात वेळ,पैसा,श्रम व ऊर्जाची बचत करुन आपण डिजिटल सहेली हा मानाचा किताब पटकावू शकता असा संदेश कार्यशाळेस उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी महिलांना सुमेध फाऊंडेशनच्या अध्यक्षा जानवी माखीजा यांनी दिला.

एकाच उंच उडीत आपण ऐव्हरेस्ट शिखरावर जावु शकत नाही पण एक एक पाऊल पुढे टाकत गेलो तर निश्चितच आपण शिखर सर करु शकतो. याच प्रमाणे आपल्या हातातल्या मोबाईल मधील एक एक उपयुक्त अॅपचा वापर करुन डिजिटल तंत्रज्ञाना आधारे दैनंदिन जीवनात वेळ,पैसा,श्रम व ऊर्जाची बचत करुन आपण *डिजिटल सहेली* हा मानाचा किताब पटकावु शकता आसा संदेश कार्यशाळेस असलेल्या प्रशिक्षार्थी महिलांना विश्वास व प्रेरणा देतात.

 जानवी माखीजा ,सुमेध फाऊंडेशनच्या अध्यक्षा

 

पाककृती पासुन अर्थक्रांती पर्यंत महिलांचे योगदान व श्रमदान हे अत्यंत मोलाचे आहे. महिलांनी आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे येवून ‘डिजिटल सहेली’ या उपक्रमातुन डिजिटल तंत्रज्ञान आत्मसाथ करून आत्मनिर्भरतेने आपल्या रोजच्या जीवनात प्रगती करावी.

भक्ती जाधव ,सामाजिक कार्यकर्त्या

 

सुमेध फाउंडेशनच्या डिजिटल सहेली या उपक्रमाचे कौतुक करुन महिला तंत्रज्ञान सक्षमीकरनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन विघा काॅम्प्युटर्सच्या संचालिका आदिती कामतकार यांनी दिले.

डिजिटल सहेलीच्या उद्गधाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रीकांत अंजुटगी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here