उद्या ढोल ताशांच्या आवाजात दुमदुमणार पार्क स्टेडियम

0

(वेब टीम)

डॉल्बी मुक्त उत्सवसाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उद्या पासून स्पर्धा सुरू
डॉल्बी मुक्त उत्सव या अभियानांतर्गत गणेशोत्सव व मोहरम सणाचे निमित्ताने पोलीस आयुक्तालयाचे वतीने सोमवार दि. १७ रोजी व मंगळवार दि. १८ रोजी लेझीम, ढोल ताशा पथकांच्या स्पर्धा सायंकाळी ५ ते रात्री १० वा. दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियम(पार्क स्टेडियम) येथे आयोजित केलेल्या आहेत.

अशा होतील ढोल,ताशा व लेझीम स्पर्धा
सोमवार दि. १७ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वा. पर्यंत -ढोल/ताशा पथक.
मंगळवार दि. १८रोजी सायंकाळी ५ वा
ते रात्री १०वा. पर्यंत -लेझीम पथक.

स्पर्धेत भाग घेण्याच्या नियम व अटी:
१ ) विनामूल्य प्रवेश.
२) प्रथम,द्वितीय,तृतीय विजेत्या संघांना रोख व ढाल बक्षिस देण्यात येईल, तसेच प्रवेश घेतलेल्या दोन संघांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येईल.
३) महीला व पुरुष ढोल पथकाच्या संघात सदस्याची मर्यादा नाही.
४) महीला व पुरुष लेझीम संघात कमीत – कमी ४० सदस्य असावेत.
५) संघास गणवेशाची अट नाही.
६) मुली व महीलांच्या लेझीम,ढोल ताशा संघास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
७) शिस्त आणि वेळेचे बंधन पाळावे (प्रत्येक संघास १५ मिनिटे खेळण्यास वेळ देण्यात येईल)
८) पंचांचा निर्णय हा अंतिम राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here