By-एम एच१३न्यूज वेबटीम
सोलापुरातील उत्तर सोलापूर भागातील गुळवंची येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या आधी२०१३ ते २०१६ पर्यंत त्यांच्याकडे सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी अपंग सेल जिल्हाध्यक्ष पद होते. त्यांचे पक्षीय व सामाजिक काम पाहुन पक्षाने त्यांच्याकडे राज्यस्तरीय जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुहास तेंडुलकर यांनी दिले आहे. या निवडीमुळे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना नूतन प्रदेश उपाध्यक्ष धनाजी भोसले पाटील म्हणाले की आजपर्यंत केलेल्या कामाची पावती पक्षाने दिली असून यापुढे देखील अधिक जोमाने काम करून तळागाळातील बांधवांना त्याचा फायदा होईल असे कार्य करणार आहे.
या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे, कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील,बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे,संकेत ढवळे,अविनाश मार्तंडे,प्रल्हाद काशीद,पांडुरंग नवगिरे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समस्त गावकऱ्यांनी या निवडीचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.