सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी अपंग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजी भोसले-पाटील

0

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी अपंग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजी भोसले-पाटील

सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी अपंग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथील धनाजी सुभाष भोसले-पाटील यांची निवड करण्यात आली.

२०१४ ते २०१८ या कालावधीमध्ये धनाजी भोसले-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी होते. अध्यक्षपदाच्या काळात अपंगांच्या विविध मागण्या संदर्भात सतत पाठपुरावा केला होता.अपंगांना मोफत साहित्य वाटपाचा कार्यक्रम,अपंगांच्या पदोन्नतीचा विषय, अपंगांच्या विविध मागण्या संदर्भात आंदोलने,मेळावे घेण्यात आले होते.त्याच कामाच्या जोरावर त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. दरम्यानच्या काळात अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. अपंग सेलचे प्रदेश अध्यक्ष सुहास तेंडुलकरसाहेब यांनी पुन्हा त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली असून
धनाजी भोसले -पाटील हे बळीराम काका साठे यांचे कट्टर समर्थक आहेत.

गुरुवारी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचेपत्र देण्यात आले.यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे जिल्हा कार्याध्यक्ष ज्योत्सना पाटील,पूजा सदाफुले, शहाजी बोराडे हे उपस्थित होते.

येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तळागाळातील सर्व अपंग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राहील. देशाचे नेते शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे यांच्या विचारानुसार प्रदेशअध्यक्ष सुहास तेंडुलकर आणि जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामान्य दिव्यांगाच्या विकासाठी प्रयत्न करणार असे मत नूतन जिल्हाध्यक्ष धनाजी भोसले-पाटील यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here