मी व माझे कुटुंब श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून आपण स्वामी दर्शनापासून वंचित होतो. आता मंदिर उघडल्यानंतर स्वामी समर्थानी दर्शन देण्याचा योग्य आज घडवून आणला. यानिमित्तानं अनेक दिवसांपासून असलेली स्वामी दर्शनाची आस आज पूर्ण झाली असल्याचे प्रतिपादन इचलकरंजीचे खासदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते.
या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी धैर्यशील माने व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्तिथीसह सोलापूर जी.एम. ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, तळे हिप्परगीचे सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, पप्पू गायकवाड, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख, शहर प्रमुख योगेश पवार, कांतु कडबगावकर, सोपान निकते, खंडू कलाल, गिरीश पवार, सागर गोंडाळ, विपुल जाधव, प्रवीण घाटगे, नागू गुंजले, रमेश होमकर, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते.