‘कलासंगम’ ची भक्तीसेवा ; श्रीसिद्धेश्वर जत्रेचा साकारला देखावा

0

Mh13news Network

संस्थापिका व माजी महापौर सौ.शोभाताई बनशेट्टी यांच्या नेतृत्वात कलासंगम फौंडेशन च्या वतीने गेल्या २२ वर्षापासून जत्रेच्या ६८ लिंग मार्गावर नयनरम्य रांगोळीच्या पायघड्या व गालीच्या चे रेखाटन केले जाते, परंतु गेल्या वर्षी व या वर्षी कोरोना आणि ओमिक्रोन च्या संसर्गाच्या भिंतीने शासनाने जत्रा आणि ६८ लिंग परिक्रमे साठी परवानगी नाकारली आहे, परंतु कलासंगम फौंडेशन च्या कार्यकर्त्यांनी शासनाचे सर्व नियम पाळून शिवानुभव मंगल कार्यालय येथे या जत्रेच्या सर्व आठवणी जिवंत केल्या आहेत.

६८ लिंगांचे रांगोळीतून रेखाटन आणि सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेले अष्ठविनायकांचे रांगोळीतून रेखाटन केले आहे त्याच बरोबर सिद्धेश्वर महाराजांनी श्री.मलैय्यासाठी आईकडे दही भाताची मागणी केली त्याचा देखवा मूर्ती स्वरुपात उभा केला आहे व ते दही भात घेऊन मलैय्यांना हुडकत हुडकत श्रीशैल पर्वता पर्यंत जाऊन मलैय्या न भेटल्याने निराश होऊन कमरी मठा जवळील दरीत प्राणार्पण करण्यास उतरत असताना स्वतः श्री.मलैय्यानी येऊन त्यांना वाचविले हा देखावा सुद्धा मूर्ती स्वरुपात दाखविला आहे त्याच बरोबर ७ काठ्यांची उभारणी देखील हुबेहूब केली आहे.

देशावर आलेल्या संकटाला घाबरून घरी बसले तर ते कलासंगम चे कार्यकर्तेच नाहीत हे पुन्हा एकदा या माध्यमातून त्यांनी सिद्ध केले आहे. या साठी गेले २ दिवस कलासंगमच्या कार्यकर्त्यांनी आहोरात्र परिश्रम घेतले आहेत या रेखाटनासाठी ५ पोती रांगोळी व ५० किलो रंगीत रांगोळी लागली आहे.

सदर कार्यक्रमासाठी :-

श्रीशैल बनशेट्टी, पद्माताई वेळापुरे, रूपाताई कुताटे, रक्षा रायकर, प्रदीप बेलुरे, स्वप्नील शितोळे, सागर नडमाने, मोनिका भिंगारे, श्रुतिका गणेचारी, स्नेहा राठोड, सपना केरुरकर, अविनाश जिनकेरी, मल्लिनाथ याळगी, रवींद्र आमणे, निलेश सरवदे, विजयकुमार बिराजदार, मल्लेश पुरवंत यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here