देव पावला | साक्षात पांडुरंग आला मदतीला… वाचा सविस्तर

0

Mh13news Network

पंढरपूर तालुक्यात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. रुग्णांना दिलासा देण्यासाठी ‘कोविड हेल्थ केअर सेंटर’ सुरू करण्यासाठी श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती धावून आली आहे. डॉक्टरांनी नाममात्र भाडे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, मंदिर समितीने सामाजिक भावनेतून निशुल्क देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे साक्षात पांडुरंग कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आल्याची भावना पंढरीवासीयांतून होत आहे.

वेदांता व व्हिडिओकॉन (Vedanta and Videocon)भक्त निवासातील खोल्या व त्यामध्ये 200 बेड निशुल्क उपलब्ध केल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, तसेच सद्यस्थितीचा पंढरपूर शहर व परिसरात देखील मागील 15 दिवसांपासून रोज 200 ते 250 कोरोना चे रुग्ण आढळून येत आहेत.

पंढरपूर शहर व परिसरातील सर्व कोविड रुग्णालय भरलेली असून 65 एकर व श्री गजानन महाराज भक्तनिवास येथील कोविड केअर सेंटर (Covid care center) मध्ये देखील जागा उरलेली नाही. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोविड केअर सेंटर तयार करण्यासाठी असलेली जागेची निकड लक्षात घेता, सर्वे नं. 59 येथील वेदांता व व्हिडिओकॉन भक्त निवासाच्या खोल्या व गरज पडल्यास उपलब्ध करून देण्यासाठी, यापूर्वीच मंदिर समितीने सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व इतर सर्व सदस्यांची याबाबत चर्चा झाली, असून मान्यता देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here