‘दारू नाही दूध प्या’ या उपक्रमाने नववर्षाचे स्वागत!

संभाजी ब्रिगेडचा सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम

0

By-एम एच१३न्यूज नेटवर्क
सरत्या वर्षाला निरोप देताना संपूर्ण जगभरात मोठा जल्लोष केला जातो. यासाठी अनेकजण हा आनंद साजरा करताना दारूच्या पार्ट्यांमध्ये नशेत नववर्षाचे स्वागत करतात. सोलापुरातील संभाजी ब्रिगेड सलग दुसऱ्या वर्षी ‘दारू नाही दुध प्या’हा संदेश देत आहे.आज रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुधाचे वाटप व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी कडाक्याच्या थंडित बंदोबस्त करित असलेल्या पोलिस बांधवांना गुलाबपुष्प देवुन नववर्षाच्या शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती श्याम कदम यांनी दिली.

दरवर्षी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड च्या वतीने नववर्षाचे स्वागत महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, रस्त्यावरील अनाथ बेघर यांना थंडी पासून संरक्षणसाठी चादर व ब्लँकेट चे वाटप अशा उपक्रमाने केले जाते.प्रारंभी छञपती संभाजी महाराज चौकातील छञपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे.
यावेळी श्याम कदम, संभाजी भोसले,सीताराम बाबर,नागेश पवार, नागेश पवार,आशुतोष माने, कार्याध्यक्ष अरविंद शेळके,अविनाश फडतरे, इलियास शेख, मल्ल्या स्वामी चेतन चौधरी, संजय भोसले,सुलेमान पीरजादे,अजित पाटील सारंग सावंत,विठ्ठल जाधव,विकास सावंत हे या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

नववर्षाच्या निमित्ताने तरूणाई पाश्चात्य देशाचे अनुकरण करून दारू पार्टी व डीजे च्या तालावर धांगडधिंगाना घालुन व्यसनाच्या आहारी जात आहे. तरूणाईला यांपासून परावृत्त करण्यासाठी ‘दारू नाही दूध प्या’ या उपक्रमात दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. दुध हे पौष्टिक असते त्यामुळे शरीर सदृढ बनते.यामुळे मिळणारी ताकद देशाच्या संरक्षणासाठी व आईवडिलांच्या सेवेसाठी वापरावी. नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आगळ्या वेगळ्या उपक्रमाने नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.
श्याम कदम
शहर अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here