- सोलापुरात प्रथमच जागतिक मानांकनाप्रमाणे पार पडली सायकक्लोथोन स्पर्धा
- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले सायकल लवर्स क्लब चे कौतुक
रविवार सकाळी पहाटेची वेळ. अंधुक प्रकाश आणि थंडगार हवा. अशा वातावरणामध्ये घड्याळाच्या ठोक्यानुसार बरोबर सहा वाजता सायकल लवरचे मुख्य समन्वय श्री.महेश बिराजदार यांनी झेंडा दाखवला आणि एकामागून एक शेकडो सायकलप्रेमी डोक्यावर हेल्मेट घालून या धुंद वातावरणात स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी सायकलवर स्वार झाले. निमित्त होते शारदा प्रतिष्ठान संचलित सायकल लवर्स सोलापूर आयोजित सायकलोथोन 2023 या स्पर्धेचे…
सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून आयोजित केलेली सीएलएस सोलापूर सायक्लोथोनची यंदाची तिसरी आवृत्ती. सोलापूर लगत बाळे येथील लक्ष्मीतरु मंगल कार्यालयापासून स्पर्धेला सुरुवात झाली. सहभागी स्पर्धकांनी पुणे विजापूर बायपास हायवे ला 25 किलोमीटर आणि 50 किलोमीटर या दोन गटांमध्ये सायकलिंग केले. टाईम मशीन द्वारे निकाल काढून या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बक्षीस वितरण कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविकामध्ये इंजिनियर अमेय केत यांनी सायकल लवर्स कडून घेण्यात येणारे उपक्रम व सायक्लोथोन या स्पर्धेविषयी माहिती सांगितली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपल्या शालेय जीवनातील सायकलिंग बद्दलच्या आठवणीं सांगून सायकलिंगला पुन्हा चांगले दिवस आणल्याबद्दल सायकल लवर्स सोलापूरचे अभिनंदन करून उपस्थित सायकल प्रेमींचे कौतुक केले. पर्यावरण वाचवणे आणि स्वतःचा फिटनेस ठेवणे यासाठी सायकल चालवणे अतिशय गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
याप्रसंगी या स्पर्धेमध्ये स्वतः सहभागी होऊन 50 किमी प्रकारात अव्वल दहा स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळवलेले सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त व सायकलिस्ट डॉ. विजय कबाडे यांनी स्पर्धेदरम्यानचा आपला अनुभव सांगून उपस्थितांचे मनोबल वाढवले.
एस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी सोलापूर मध्ये टाईम मशीन लावून जागतिक मानांकनानुसार प्रथमच अशी स्पर्धा सोलापुरात भरवील्याबद्दल सायकल लवर्स ग्रुपचे धन्यवाद मानून पुढील वर्षी आणखी मोठी स्पर्धा घ्यावी असे मत व्यक्त केले.
शेवटी आभार प्रदर्शन शारदा प्रतिष्ठानचे सचिव डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी केले. त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल लक्ष्मीतरु गार्डनचे विशाल बन्सल , गंगाधर कल्याणकर, स्पर्श हॉस्पिटलचे आनंद मुदकन्ना, प्रभाकर चव्हाण, अविनाश देवडकर , अद्वैत लवटे, अविनाश कुरापती, बालाजी सुरवसे, प्रदीप कदम, चंद्रकांत दुधाळ, वालेस चे अनुराग पाटील, श्री मदनलाल, रेडिओ आर जे पल्लवी व विजय आवटे यांचे आभार मानले.
सायकल लवर्स चे पदाधिकारी महेश बिराजदार अविनाश देवडकर डॉक्टर प्रवीण ननवरे इंजिनिअर अमेय केत, प्रवीण जवळकर यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे…
50 किलोमीटर पुरुष गट – प्रथम क्रमांक स्वप्नील नाईक, द्वितीय क्रमांक प्रकाश गायकवाड, तृतीय क्रमांक अभिजीत वाघचौरे,
50 किलोमीटर महिला गट – प्रथम क्रमांक डॉक्टर रूपाली जोशी,
25 किलोमीटर पुरुष गट
–प्रथम क्रमांक ओंकार हलगडे, द्वितीय क्रमांक अतुल बंदीवाडेकर, तृतीय क्रमांक रघुवीर फुलारी
25 किलोमीटर महिला गट
– प्रथम क्रमांक विजया देवडकर, द्वितीय क्रमांक डिंपल कटारिया, तृतीय क्रमांक डॉक्टर तृप्ती राठी.