सोलापूर | ग्रामीण भागात बरे झाले 327; पॉझिटिव्ह 281 तर 6 जणांचा मृत्यू

0

MH13 News Network 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज गुरूवारी ग्रामीण भागातील तब्बल 281 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 173 पुरुष तर 108 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 327 आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1833 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1552 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 8 हजार 661 इतकी झाली आहे. यामध्ये 5 हजार 212 पुरुष तर 3 हजार 449 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 243 जणांचा मृत्यू झाला आहे यात 165 पुरुष तर 78 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 825 आहे .यामध्ये 1हजार 796 पुरुष 1 हजार 29 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 5 हजार 539 यामध्ये 3251 पुरुष तर 2342 महिलांचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here