पीक कर्ज | अर्ज करण्यासाठीच्या वेबसाईट,लिंक ;अडचण आल्यास शेतकऱ्यांनी…

0

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

सोलापूर, दि.2 : पीक कर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तालुक्याच्या सहकार निबंधक किंवा तहसीलदार कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात पीक कर्ज वाटप अतिशय सुलभरित्या व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यातील एक भाग म्हणून सहकार विभागाच्या यंत्रणेतून शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले. गर्दी टाळण्यासाठी पीक कर्ज मागणीचा अर्ज ऑनलाईनही करता येईल अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या
https://solapur.gov.i
https://solapur.gov.in/n संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करावी, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे. त्याचबरोबर सहकार विभागाची यंत्रणाही याकामासाठी वापरण्याचे ठरविण्यात आले आहे.

याबाबत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कर्ज हवे असणाऱ्या शेतकऱ्यांनी गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवांकडे मागणींचा अर्ज भरुन द्यावा. त्यासाठी गटसचिव शेतकऱ्यांना मदत करतील. शेतकरी सोसायटीचा सभासद असेल आणि त्यास सोसायटी कडून पीक कर्ज मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज सोसायटी सचिवांकडे द्यावा. सचिव हे अर्ज संबंधीत राष्ट्रीयकृत बँकाकडे पाठविणार आहेत.

याबाबत जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियानेही पुढाकार घेतला आहे. वेबसाईट द्वारे प्राप्त होणारे अर्ज छाननी करुन संबंधीत बँकाकडे प्रक्रियेसाठी पुढे पाठविण्यात येत आहेत. आतपर्यंत वेबसाईटवर 3649 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 2225 अर्जावर प्रक्रिया करण्यात आली. यामंजूर झालेल्या अर्जदार शेतकऱ्यांना सुमारे 25 कोटी रुपयांचे कर्ज मिळेल. उर्वरीत अर्जावर लवकरच प्रक्रिया केली जाऊन त्यांनाही कर्ज मंजूर केली जाईल अशी माहिती बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू यांनी दिली आहे.

अर्ज करण्यासाठीच्या वेबसाईट,लिंक

शेतकऱ्यांनी पीक कर्ज मागणी अर्ज भरण्यासाठी https://solapur.gov.in – दस्त ऐवज – ऑनलाइन अर्ज भरा – पीक कर्ज मागणी अर्ज 2020-2021 वर क्लिक करावे, अथवा https://solapur.gov.in – कोरोना – पीक कर्ज मागणी अर्ज 2020-2021 लिंकवरील फॉर्म भरून पीक कर्ज मागणी नोंदणी करावी. नोंदणीमध्ये काही अडचण आल्यास दत्तक बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. कडू यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here