शेतकऱ्यांना त्रास दिल्यास बँकांविरोधात घेतला जाईल गंभीर निर्णय -एकनाथ शिंदे

0

MH13NEWS Network

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या दोन लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला.या प्रक्रियेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी दोन दिवसांपूर्वीच बैठक पार पडली आहे. या बैठकीत संबंधित बँका, अधिकारी यांना कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.शेतकरी खातेदाराला बँकेने त्रास दिल्यास, त्यांच्याविरोधात सरकार गंभीर निर्णय घेईल, असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.पुण्यातील कार्यक्रमात ते बोलत होते.

एका शेतकऱ्याला त्याच्या मुलीसह मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षकांनी अडवले होते. त्यांनी बँकेने आपल्याला सतत विनाकारण त्रास दिल्याची तक्रार केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर बँकांना आदेश दिले आहेत. भूमिगत मेट्रोच्या कामासाठी नव्याने आलेल्या टीबीएम टनेल बोरिंग मशीनची एकनाथ शिंदे यांनी काल पाहणी केली. मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभही त्यांच्याच हस्ते करण्यात आला, याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here