Court Update |शंकर म्हेत्रेच्या अटकपूर्व जामीनावर आज निकाल

0

शंकर म्हेत्रे याच्या अटकपूर्व जामीनावर आज निकाल

सोलापूर – रेवनसिद्ध मल्लिनाथ सोन्नद यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अक्ककोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेल्या अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर सातलिंगआप्पा म्हेत्रे आणि गुरुशांत कोलाटी दोघे रा. दुधनी, ता. अक्कलकोट यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. भोसले सो. यांच्या न्यायालयात मूळ फिर्यादीतर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी आज युक्तिवाद केला.

मूळ फिर्यादीतर्फे युक्तिवाद करताना अँड न्हावकर यांनी,
आरोपी शंकर म्हेत्रे याने 10 लाखाचा जास्त दंड लावून 27 लाखाची मागणी केल्याने, त्यासाठी रोज दमदाटी केल्याने आणि ती पूर्ण करणे शक्य नसल्याचे खात्री असल्याने सोन्नद याने विष पिऊन आत्महत्या केली, विष पिल्यानंतर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना बॉण्ड वर सर्व हकीकत लिहिली त्यावर सही करताना फोटो काढला आणि फिर्यादीस विडिओ रेकॉर्डिंग करायला सांगून त्यात शंकर म्हेत्रेच्या त्रासामुळे विष पिल्याचे सांगितले त्याचप्रमाणे मयताचे कुटुंबियांना रक्कम माफ करतो पोलिसांनी कोणाविरुद्ध तक्रार नाही असे सांगण्यास धमकावले तसेच फिर्यादीस शंकर म्हेत्रे याने व्हॉइस मेसेज पाठवून दोघे येऊन भेटा नाहीतर जिवंत दिसणार नाही अशी धमकी दिल्याचे व आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले,
न्यायालयाने निकालासाठी आज दि 20/1/23 रोजी सुनावणी नेमली आहे.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे बंधू व अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यात आरोपी असल्याने संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचे या सूनवणीकडे लक्ष लागलेले आहे.
यात मूळ फिर्यादीतर्फे ॲड. संतोष न्हावकर अँड. राहुल रूपनर,सरकारतर्फे रामपुरे तर आरोपीतर्फे ॲड. श्रीकांत गडदे हे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here