छप्पर फाडके : स्मार्ट महापालिकेतील प्रेक्षक गॅलरीची डर्टी अवस्था

कौन्सिल हॉल मधील ओंगळवाणे चित्र

0

By-MH13NEWS,नेटवर्क

स्मार्ट आणि स्वच्छ सोलापूरचा दिंडोरा पेटणार्‍या सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल मधील दालनाची अवस्था डर्टी झाली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव बळवंतराव चव्हाण सभागृह म्हणजेच कौन्सिल हॉल वरचे छप्परला मोठं भगदाड पडलं आहे. जवळपास 2 वर्षांपासून अशाच अवस्थेत आहे.याच सभागृहात आज बुधवारी 17 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन केलेलं आहे.
सर्वसाधारण सभेत जवळपास सर्व नगरसेवक उपस्थित असतात. महापौर,उपमहापौर, महापालिका आयुक्त असे उच्चपदस्थ अधिकारी व पदाधिकारी हजेरी लावतात. सभागृह नेता,विरोधी पक्षनेता, विविध विभागाचे अधिकारी याच ठिकाणी सोलापूर शहरवासीयांसाठी आराखडे बनवत असतात .याच सभागृहात शहरातील महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे नियोजन केलं जातं.

आता झालं असं की, यापैकी कोणत्याच उच्चपदस्थ पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेलं दिसून येत नाही. प्रेक्षागृहात तर ओंगळवाणे चित्र दिसून येतं. तुटलेली लोखंडी खुर्ची ,कोपर्‍यातच कोंबलेला कचरा, तुटलेला फर्निचर पाण्याची बाटली, घाणेरड्या उशा इथेच टाकलेल्या आहेत की संग्रहणीय म्हणून जपून ठेवल्या आहेत ?असं वाटत आहे.

उपमहापौर कक्षा पासून प्रेक्षागृहा कडे जाताना दरवाजाला चिटकूनच तुटकी हात मोडलेली जुनाट खुर्ची ठेवलेली आहे.बहुदा हा कोण्या अधिकाऱ्यांच्या आठवणीसाठी ठेवलं असावं.असं मत काही गॅलरीत येणाऱ्याने व्यक्त केले. त्याला चिटकूनच एक जुनाट रॅक आहे.त्यामध्ये शेकडो जुन्या फायली रचून ठेवल्या आहेत.

आज पर्यंत या प्रेक्षक गॅलरीच्या दुरुस्तीसाठी चार वेळा टेंडर काढले होते.परंतु कोणत्याही ठेकेदाराने यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण केली नाही.त्यामुळे लवकरच आणखीन एकदा ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

सारिका आकुलवार
अधीक्षक भूमी मालमत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here