सोलापूर | आज तब्बल ९०० अहवाल ; ७४७ निगेटिव्ह १५३पॉझिटिव्ह .. या भागातील

0

MH 13 News Network

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज गुरूवारी तब्बल 900 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 747अहवाल निगेटिव्ह आले असून 153 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 79 पुरुष तर 74महिलांचा समावेश होतो .आज 208 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 68 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

आज 4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे .अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी दिली.

आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3537 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 314 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1247 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1976 इतकी समाधानकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here