सोलापूर ग्रामीण | ‘निगेटिव्ह’ 611 कोरोनामुक्त 139 तर 147 पॉझिटिव्ह, या भागातील…

0

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज गुरुवारी ग्रामीण भागातील 147 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 88 पुरुष तर 59 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 139 आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3459 इतकी झाली आहे. यामध्ये 2103 पुरुष तर 1356 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 98 जणांचा मृत्यू झाला आहे यात 66 पुरुष तर 32 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1404 आहे .यामध्ये 872 पुरुष 532 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1957 यामध्ये 1165 पुरुष तर 792 महिलांचा समावेश होतो.

आज मृत्यू नोंद झालेली व्यक्ती खवा बाजार पंढरपूर येथील 70 वर्षाचे पुरूष तर दुसरी व्यक्ती सिद्धिविनायक सोसायटी . पंढरपूर येथील 62 वर्षांची महिला त्यांचे निधन झाले अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी. टी. जमादार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here