सोलापूर Corona 5050 ; आज 903 निगेटिव्ह 65 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

0

MH 13 News Network
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शनिवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार 968 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 903 अहवाल निगेटिव्ह आले असून 65 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 31 पुरुष तर 34 महिलांचा समावेश नसल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 25 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.
पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज पर्यंत एकूण 364 जणांचा बळी या आजाराने गेला आहे यामध्ये 240 पुरुष तर 124 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5050 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 364 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1625 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 3061 इतकी लक्षणीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here