कोरोना लढा | ‘या’आमदाराने दिले 2 रुग्णवाहिका, चार X-ray मशिन

0

MH13 News Network 

कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून सोलापूर महापालिकेला सोमवारी दोन रुग्णवाहिका व चार एक्स रे मशिन भेट देण्यात आले.

या रुग्णवाहिका तसेच एक्स रे मशिनचे महापालिकेच्या आवारात भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त डॉ. पंकज जावळे, धनराज पांडे, आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, नगरसेवक विनायक विटकर, शिवानंद पाटील, अनंत जाधव, सुभाष शेजवाल, रुद्रेश बोरामणी उपस्थित होते.

मनपाकडून नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्याच्या उद्देशाने आ. देशमुख यांनी मनपाला प्रत्येकी 16 लाख किंमतीच्या दोन रुग्णवाहिका, प्रत्येकी 1 लाख 10 हजार किंमतीच्या एकूण चार एक्स रे मशिन दिल्या आहेत. या रुग्णवाहिका व एक्स रे मशिनमुळे शहरातील गोरगरिब जनतेला मनपाच्या आरोग्य विभागामार्फत चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष विक्रम देशमुख म्हणाले की, सोलापूरकरांना उत्तम व चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी कार्य करीत आहेत, कोविड 19 मध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम असणे किती गरजचे आहे हे सर्वांच्याच लक्षात आले आहे. या अनुषंगाने आ. विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन रुग्णवाहिका व चार एक्स रे मशिन्स महापालिकेस दिल्या आहेत. यापुढील काळातही महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम करुन शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील. महापौर यन्नम म्हणाल्या की, मनपाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या पार्श्वभूमीवर मनपाच्या आरोग्य यंत्रणेस लागणार्‍या बाबींची माहिती आ. देशमुख यांना दिली. यावर लागलीच आ. देशमुख यांनी दोन रुग्णवाहिका व चार एक्स रे मशिन देण्याचे मान्य केले. तातडीने दोन महिन्यांतच या सर्व गोष्टींची पूर्तता आ. देशमुख यांनी करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते.

गोरगरिबांसाठी कटीबद्ध : डॉ. किरण देशमुख

याप्रसंगी नगरसेवक डॉ. किरण देशमुख म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. आज खासगीमध्ये एक्स रे काढावयाचे झाल्यास तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक परिस्थितीअभावी उपचारापासून वंचित होता. हे लक्षात घेता नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्याच्या उद्देशाने आ. देशमुख यांनी रुग्णवाहिका व एक्स रे मशिन्स दिल्या. यापुढील काळातही शहरातील कोणताही गोरगरिब व्यक्ती उपचाराविना राहणार नाही यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here