जय महाराष्ट्र ! शिवसेनेच्या नेत्याची ‘कॉंग्रेस’मध्ये इंट्री…

0

MH13NEWS Network

सोलापूर शहर शिवसेना उपशहरप्रमुख शंकर चौगले यांनी आज रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनवास्तल्य निवासस्थानी कॉंग्रेस पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश केला.

श्री शंकर चौगुले हे लेबर फेडरेशन चे संचालक, विद्यापीठ सिनेट सदस्य, खाण मालक संघटना, वडार समाज संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे कार्य सुरू असून त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे कॉंग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत सहकार्य होणार आहे.

यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, गोपी मुदगल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here