मदतीचा एक घास | मिळतोय गरजूंना आधार ; काँग्रेसचा उपक्रम

0

आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल च्या माध्यमातून कोरोनामुळे संकटात असलेल्या नागरिकांसाठी मोफत जेवणाचा उपक्रम “मदतीचा एक घास” या उपक्रमाचा सुरुवात करण्यात आली आहे.

शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शनी सेल यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोरोना प्रादुर्भावामुळे संकटात असलेल्या नागरिकांसाठी “मदतीचा एक घास” मोफत जेवण वाटप उपक्रमाची सुरूवात आज रोजी श्री जांबमुनी चौक लष्कर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली तसेच शहरातील सुनील नगर, रामवाड़ी, मौलाली चौक, मल्लिकार्जुन नगर सुत मिल, 70 फुट रोड कुमठा नाका, सिव्हिल हॉस्पिटल, मोदी चौक या आठ ठिकाणी आज मोफत जेवण वाटप करण्यात आले. टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागातही मोफत जेवण वाटप उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले कि कोरोना संकटकाळात अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांना काल मी आवाहन केल्याप्रमाने आज सकाळपासुन अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या घरात तयार करुण आणलेले चपाती, भाजी व अन्न आधार केंद्र येथे जमा केले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला असून जमा झालेल्या चपाती, भाजी, अन्न याचे व्यवस्थितपणे पॅकिंग करुण मदतीचा एक घास म्हणून शहरातील 8 ठिकाणी जवळपास एक हजार नागरिकांना जेवण वाटप करण्यात आले. असुन लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे उदयापासुन अजुन काही नवीन भागात ही मोफत जेवन वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमात महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रियदर्शिनी सेल च्या श्रद्धा हुल्लेनवरु, प्रियंका डोंगरे, हनमंतु सायबोळू, दिनेश म्हेत्रे, गणेश डोंगरे, यल्लप्पा तूपदोळकर, सुनील साका, विवेक इंगळे, प्रकाश आसादे, अंबादास नडगिरी, जीतू वाडेकर, राज शिंदे, जॉन चौगुले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका वैष्णवीताई करगुळे, परवीन इनामदार, सुमन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, अंबादास करगुळे, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, विणाताई देवकते, ऐश्वर्या नंदुरकर, बसंती सालुंखे, शिल्पा चांदने, संतोषी गुंडे, रतन डोळसे, मुमताज तांबोळी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते शहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here