सिध्देश्वर कारखान्याला कोणतीही बाधा न येता विमान सेवेसाठी प्रयत्न करू – विश्वनाथ चाकोते

0

सिध्देश्वर कारखान्याला कोणतीही बाधा न येता विमान सेवेसाठी प्रयत्न करू – विश्वनाथ चाकोते

सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूरच्या सिध्देश्वर साखर कारखान्याला कोणत्याही प्रकारची बाधा न येता सोलापूर मधून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रीत येवून प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करू असे प्रतिपादन माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत केले.
सोलापूरचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे यासाठी प्रत्येकजण कार्यरत असताना एकमेकांवर वैयक्तिक चिखल फेक करून वाद वाढवू नये काडादी घराण्याचे सोलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे. अनेक शिक्षण संस्था, उद्योग, कारखाने, संस्था त्यांनी लोकांच्या हितासाठी सुरू केल्या आणि त्या यशस्वीपणे सुरू आहेत. त्यांच्यावर वैयक्तीक टिका टिप्पणी टाळली पाहिजे. सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सुरू असलेल्या विमानसेवेचा प्रयत्न चांगला आहे. त्यांचीही मागणी केवळ विमानसेवा सुरू व्हावी एवढीच आहे चिमणी पाडा किंवा कारखाना बंद करा अशी त्यांची मागणी नाही परंतु काही लोक सिध्देश्वर साखर कारखाना बंद पडावा म्हणून प्रयत्नीशील आहेत त्यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे. हजारो कामगार शेतकरी यांचे परिवार या सिध्देश्वर साखर कारखान्यावर अवलंबून आहे. साखर कारखाना टिकला पाहिजे आणि विमान सेवाही सुरू झाली पाहिजे यासाठी दोन्ही बाजुने प्रयत्न होणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रीत येवून एक शिष्टमंडळ तयार करून पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडे सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी टिकावी आणि सोलापूर मधून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करून शासनाकडे हा प्रश्न मांडले पाहिजे. पालकमंत्री विखेपाटील यामध्ये लक्ष देवून हा प्रश्न निकाली काढू शकणार आहेत.
होटगी विमानतळ हे बंद नाही या विमानतळावरून वर्षभरात जवळपास 300 ते 350 इतके विमान उड्डाण करतात अनेक व्हिआयपीची विमाने उड्डाण करतात आणि उतरतात. असे असताना सर्वसामान्यांसाठी विमानसेवा बंद का यासाठी केंद्रीय विमान वाहतुक मंत्री तसेच डिजीसीए कडे ही वस्तुस्थिती मांडणे गरजेचे आहे त्यासाठी पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत प्रयत्न करावे लागणार आहेत.

माजी आमदार स्वर्गिय बाबुराव अण्णा चाकोते, सहकारमहर्षी वि गु शिवदारे, कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्यासह अनेक ज्येष्ठ सहकार तपस्वींनी सिध्देश्वर साखरकारखान्याची अत्यंत कष्टाने मूहूर्तमेढ रोवली पारदर्शी कारभाराने धर्मराज काडादी यांनी हा कारखाना सुरू ठेवला आहे. या कारखान्याला कोणत्याही प्रकारची बाधा येवू नये आणि सोलापूरला विमान सेवा सुरू झाली पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्रीत येवून प्रयत्न केले पाहिजे कोणावरही वैयक्तीक टिका टिप्पणी करून कोणाचा अवमान होईल असे कृत्य करून सोलापूरचे वातावरण बिघडवू नये अशी मागणीही माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली.

सिध्देश्वर साखर कारखाना टिकला पाहिजे आणि सोलापूर मधून विमान सेवा सुरू झाली पाहिजे यासाठी सर्वांनी बोरामणी विमानतळासाठी ही प्रयत्न केले पाहिजे. सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी दूरदृष्टी ठेवून बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे म्हणून जागा मिळवून दिली परंतु पुढे सरकारकडून योग्य ते लक्ष देवून निधी न देता या बोरामणी विमानतळाचे काम रखडले आहे त्यासाठीही सरकारकडे पाठपुरावा करून बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सर्वांनी मिळून केले पाहिजे सोलापूरच्या भविष्यातील विकासासाठी बोरामणी विमानतळ होणे अधिक महत्वाचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्याप्रमाणात निधीची आवश्यकता आहे त्यासाठी सरकारकडे प्रयत्न होणे आवश्यक आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करणे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here