मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर स्वागत

0

(वेब,टीम)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आले असून सोलापूर विमानतळावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या समवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांचेही आगमन झाले.

            विमानतळावर पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, उपमहापौर शशिकला बत्तुल, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे – पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. यावेळी मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here