छत्रपती शिवाजी महाराज यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

1
MH13NEWS Network 
आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त श्री.छत्रपती शिवाजी चौक येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळयास, कौन्सिल हॉल येथील प्रतिमेस तसेच महापौर कार्यालयातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मा.महापौर सौ.श्रीकांचना यन्नम यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच प्रशासकिय इमारतीतील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस आमदार प्रणितीताई शिंदे व महापौर सौ.श्रीकांचना यन्नम, आयुक्त दिपक तावरे यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले.
        याप्रसंगी उपमहापौर राजेश काळे, सभागृहनेता श्रीनिवास करली, गटनेता आनंद चंदनशिवे, चेतन नरोट, नगरसेविका ज्योती बमगोंडे, अनुराधा काटकर, मनिषा हुच्चे, वंदना गायकवाड, संगिता जाधव, शालन शिंदे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विनोद भोसले, गणेश पुजारी, प्रथमेश कोठे, परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे उपस्थित होते.
 यावेळी सहा.आयुक्त वि.एस.पाटील, एस.बी.पवार, मुख्यलेखापाल शिरिष धनवे, विभागीय अधिकारी माहेन कांबळे, विधान सल्लागार एस.एस.भाकरे, सहा.अभियंता युसूफ मुजावर, राजेश परदेशी, अंतर्गत लेखापरिक्षक मुंडेवाडी, कर्मचारी संघटनेचे प्रदिप जोशी, शशिकांत शिरसट, वरिष्ठ पतसंस्था संस्थेचे शिवानंद कोरे, संजय सावळगी, महापौर कार्यालयाचे स्वियसहाय्यक राहुल नागमोती, गणेश बिराजदार, भास्कर सामलेटी,  माऊली पवार,  भोजराज पवार, सनिल रसाळे, गजानन केंगनाळकर, मल्लु सातलगाव, दत्तात्रय सनके, तुकाराम चाबुकस्वार, धनराज जानकर, सिध्देश चौगुले, आनंद बमगुंडे,  बहुसंख नागरिक व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here