सोलापूरच्या प्रवेशद्वारावर तब्बल 32 फुटी बुरुजाची उभारणी ; छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरणास वेग

0

चेंबूर च्या धर्तीवर होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील बत्तीस फूट बुरुज बनविण्याच्या कामाचा शुभारंभ पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या हस्ते करण्यात आला.आज सोमवारी दुपारी बारा वाजता बुरुजाच्या कामाची सुरुवात करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव व किरण पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील सुशोभीकरण चेंबूर च्या धर्तीवर होण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन दिले होते, त्याची दखल घेऊन डीपीडीसी मधून 87 लाख रुपये मंजूर केले होते, त्याच्या कामाची सुरुवात सुरू असून, सध्या आकारा सात फुटी बुरुजाचे काम पुर्ण झाले आहे, आज छत्रपती संभाजी महाराज पुतळा मागील बत्तीस फुटी बुरुज बनवण्याच्या कामाचा शुभारंभ पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी नगरसेविका स्वाती आवळे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव व किरण पवार, यांच्यासह सुहास कदम, सोमनाथ राऊत, निशांत साळवे, समाधान आवळे, सुनील बेत, केसकर, राजाभाऊ आलूरे, विनय ढेपे, ललित धावणे,जीवन यादव, सुनील नागने, पवन आलूरे, राहुल जाधव, मकरंद माने, संदीप जाधव, जितेश मासे, माणिक गोसावी, उमेश लोकरे, सिद्धार्थ कांबळे, आकाश जाधव, शंभू घळके, गणेश कोळेकर, माउली चटके, गजू खीलारे, सागर धावणे, अनिल इंगळे, आदीसह शिव भक्त उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here