‘चाय पे चर्चा नव्हे,चाय पे सिलेब्रेशन’ : आ. प्रणिती शिंदे

नागरिकांना चहा वाटप करून युवक काँग्रेसने केला विजयी जल्लोष

0

By-एम एच13न्यूज (वेब/टीम)

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला प्रचंड यश प्राप्त झाल्याने सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) येथे आमदार प्रणिती शिंदे ,माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापुरातील नागरिकांसाठी “टी पार्टी” आयोजित करण्यात आली होती.
यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे मुखवटे घातलेल्या युवकांच्या हातून नागरिकांना चहा वाटप करून काँग्रेस पक्षाचा विजय साजरा केला.
यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, गटनेते चेतन भाऊ नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, खजिनदार अप्पाशा म्हेत्रे, प्रदेश सचिव अलकाताई राठोड, माजी महापौर नलिनीताई चंदेले, दक्षिण युवक अध्यक्ष सैफन शेख, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य अध्यक्ष योगेश मार्गम, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, राहुल वर्धा, मनीष गडदे, सुभाष वाघमारे, वाहिद विजापुरे, गणेश गायकवाड, शाहू सलगर, संजय गायकवाड, आकाश गायकवाड, असिफ तिंमापुरे, युवराज जाधव, मनीष गडदे, राहुल गोयल, आदी प्रमुख उपस्थितीत होते.


यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की,भाजप सरकारने 2014 च्या निवडणुकीत अनेक खोटे आश्वासन प्रचंड जाहिरातबाजी आणि प्रचाराचे विविध फंडे वापरून तसेच ‘मी एक चाय वाला म्हणून चाय पे चर्चा ‘कार्यक्रम करून जनतेला खोटे बोलून सत्तेवर आले.आज जनतेने काँग्रेस पक्षाला विजयी करून त्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून दिले. त्यामुळे हा विजय साजरा केला जात आहे.या “टी पार्टीस” नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून चाय पे चर्चा नव्हे “चाय पे सिलेब्रेशन” आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वाचा विजय असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष नक्कीच सत्तेवर येईल असा विश्वास यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत आहोत असेहीप्रणिती शिंदे म्हणाल्या.

यावेळी सुभाष वाघमारे, गणेश गायकवाड, आकाश गायकवाड, मनोहर माचेर्ला, उमर मुकेरी, असिफ तिंमापुरे, बाबा पठाण, युवराज जाधव, अशफाक बागवान, राहुल गोयल, कुणाल घोडके, दिनेश डोंगरे, बाबुराव क्षीरसागर, सुमन जाधव, प्रनोती जाधव, हारून शेख, डॉ. आप्पासाहेब बगले, आरिफ शेख, अंबादास गुत्तीकोंडा, चक्रपाणी गज्जम, प्रमिला तुपलवंडे, सायमन गट्टू, मनोज दरेकर, दीपक फुले, नागेश सुलाखे, अशोक गायकवाड, रोहित भोसले, शरद गुमटे, अस्लम शेख, शोभा बोबे, गणेश जाधव, श्रीनिवास तोपुल, श्रीकांत गायकवाड, वीणाताई देवकते, मीनाक्षी बंकांपुरे, आदि पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here