Breaking | छगन भुजबळ कोरोना ‘पॉझिटिव्ह’

0

नाशिक : राज्याचे अन्न पुरवठा आणि नागरी संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते कोरोना आढावा बैठक, साहित्य संमेलन आढावा बैठक तसेच इतरही अनेक बैठकांचे त्यांनी आयोजन केले होते. यामुळे त्यांच्या संपर्कात जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि साहित्य संमेलनाशी संबंधित अनेक जण आले आहेत.

दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सोमवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत ही संचारबंदी लागू असेल. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १ हजार रुपये दंड आणि प्रसंगी गुन्हा दाखल करायचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

याशिवाय गोरज मुहूर्तावरील लग्नाला परवानगी नाकारताना ५० लोकांमध्ये लग्न आटोपते घ्यावे, असे आवाहन ही छगन भुजबळ यांनी केले आहे. दरम्यान, लग्न समारंभ, गर्दीचे ठिकाण, भाजी मंडई, दुकाने येथे जाऊन तपासणी करावी. याठिकाणी विना मास्क असलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी आशा सुचनाही भुजबळ यांनी नाशिक मनपा आणि पोलिस विभागाला दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here