हॅट्रिक | ZP ने पटकावले तीन पुरस्कार ;CEO स्वामींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

0

महाआवास अभियानात विशेष कामगिरी बद्दल सिईओ दिलीप स्वामी यांचा मुख्यमंत्री यांचे हस्ते गौरव

सोलापूर जिल्हा परिषदेस तीन पुरस्कार

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेने महा आवास अभियानात सामाजिक संस्था व डाटा एन्ट्री आॅपरेटर यांचा सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करणेत आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सन २०२०-२१ मध्ये काम केलेले जिल्ह्यांना आज या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य समन्वयक राजाराम दिघे, बार्शीचे चे गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, सांगोला चे गटविकास अधिकारी लोकरे , प्रमुख उपस्थित होते.


सोलापूर जिल्हा परिषदेचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे सहाय्यक प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, डाटा एन्ट्री आॅपरेटर सुभाष स्वामी विशेष पुरस्कार स्विकारला.

सोलापूर जिल्हा परिषदेची विशेष कामगिरी
………….,……………
सोलापूर जिल्ह्यात घरकुले बांधत असताना शासनाने दिलेले रकमेत घर बांधनेसाठी निधी कमी पडतो. अशा स्थितीत लाभार्थ्यांना इतर अर्थ सहाय्य करणेसाठी वित्तीय संस्थाचा सहभाग घेऊन घरकुलासाठी कर्ज सहाय्य उपलब्ध करणेचे महत्वपुर्ण काम सोलापूर जिल्हा परिषदेने केले आहे. या साठी बॅंकेस व इतर संस्थांचा वारंवार पाठपुरावा सिईओ दिलीप स्वामी यांनी केला आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी देखील मोठे योगदान दिले आहे. या घटकाच सोलापूर जिल्हा परिषदेस तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.


तसेच वित्तीय संस्थाचा सहभाग घेऊन डेमो हाऊस उभारले बद्दल तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. माळशिरस तालुक्यांत डाटा एन्ट्री आॅपरेटर यांनी वेळेत लाभार्थ्यांची नावे आॅनलाईन करणे, जिओटॅगींग, पर्यावरण पुरक साहित्याचा वापर, करारनामे करणे, वेळेत घरकुले पुर्ण करणेचे दृष्ट्रीने पंचायत समिती माळशिरस ने महत्वपुर्ण योगदान दिले आहे. माळशिरस तालुक्यांतील डाटा एन्ट्री आॅपरेटर सुभाष स्वामी यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.

तत्कालीन प्रकल्प संचालक अर्जुन गुंडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारीअधिकारी संतोष धोत्रे यांनी देखील विशेष योगदान दिले आहे.

कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या कष्ठाचा हा गौरव – सिईओ दिलीप स्वामी


………………….
सोलापूर जिल्हा परिषदेचे डाटा एन्ट्री आॅपरेटर पासून ते ग्रामसेवक, सरपंच, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाची टीम सोलापूर जिल्ह्यात राबली. भौगोलिक दृष्ट्या सोलापूर जिल्हा मोठा आहे. जागेचे प्रश्न खुप आहेत. लोकांना चांगली घरी हवी आहेत. त्या साठी जादा निधी साठी वित्तीय संस्थांना सहभागी करावे लागले. वेळेत घरकुल पुर्ण करणे हे देखील दिव्य काम गटविकास अधिकारी व त्यांचे टीम नी केले. त्यांचे योगदानाचा हा गौरव आहे. लाभार्थ्यांना वेळेत निघी उपलब्ध करून देणेत आला. एकत्रीत प्रशासकीय मान्यता देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे. या मुळे विशेष गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आलो आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेले परिश्रमाचा हा गौरव आहे.

सिईओ स्वामी यांनी केले राज्यास मार्गदर्शन

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ग्रामविकास विभागाने कर्मचारी आकृतीबंध तयार करणेसाठी तयार करणेत आलेले समितीचे अध्यक्ष बनविले आहे. आज देखील सिईओ स्वामी यांना या कार्यक्रमात बोलणेची संधी देणेत आली. अमृतवाणीने त्यांनी राज्यभरातून आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले विविध उपक्रमाची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here