थेट भेट | स्वामी ‘गुरुजींनी’ मुख्याध्यापक, दोन शिक्षकांना शिकवला ‘धडा’..!

0
CEO swami

सीईओ स्वामी यांचा कारवाईचा धडाका.
एक मुख्याध्यापक व तीन उपशिक्षक निलंबित

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,करमाळा येथील पांडे ,
विलास हनुमंत ओहोळ व प्रविण कृष्णात घाडगे दोघे उपशिक्षक यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी निलंबित केले आहे. या दोन्ही उपशिक्षकांवर शाळेत वांरवार गैरहजर राहणे, वारंवार रजेवर व विनापरवाना गैरहजर राहून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान केल्याचे आरोप सिद्ध झाल्याने तसेच याबाबत खासदार, माढा यांनी ०१.०९.२०२२ व ०२.०९.२०२२ रोजीच्या आढावा बैठकीमध्ये गटशिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी मध्ये दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करत नाहीत असे निदर्शनास आले होते.

त्याचप्रमाणे पालकमंत्री व खासदार , सोलापूर यांनी दिनांक- १८.११.२०२२ रोजीच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये दिलेले समक्ष सुचनेनुसार, गैरहजर राहून गैरशिस्तीचे वर्तन केल्याने शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
9 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व गटविकास अधिकारी उत्तर सोलापूर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे अचानकपणे  भेट दिली  असता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी ता. उत्तर सोलापूर येथील कार्यरत मुख्याध्यापक बसवराज कोळी व उपशिक्षक सतीश राठोड हे सरपंच व समस्थ ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या समक्ष सदर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक हे शालेय कामकाजात वेळेवर उपस्थित राहत नाहीत, कामकाज नीट करीत नाहीत, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी व वरिष्ट अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी मध्ये दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करत नाहीत असे निदर्शनास आले होते. या गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here