विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कुल चा वार्षिक स्नेहसंमेलन साजरा

0

MH13 NEWS NETWORK :
अक्कलकोट तालुक्यातील शिवपुरी येथील विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन आतिशय उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला असून, नवरस या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमात महाकवी ग. दि. माडगुळकर लिखित शेपटीवाल्या प्राण्यांची सभा या गीतापासून अगगेबाई ढगोबाई, राधे-राधे, मेरी माँ, रक्तचरित्र्य, यासारख्या अनेक सुमधुर गीतावर शालेय विद्यार्थ्यांनी ठेका धरत अतिशय सुंदर असे कला सादर केली. रॅली, स्किट, फॅशनशो, स्टँट्स, आणि नृत्ये अशा विविध कलाआविष्कारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून, संस्थाचालक मालादेवी राजीमावले, आस्ट्रोलिया चे मेरी अंदन, डॉ गिरीजा राजीमावले, यांची उपस्थिती असून, या कार्यक्रमाला अक्कलकोट तालुक्यातील तमाम पालकांनी हजेरी लावून आपल्या पाल्यांच्या कला आविष्कारांचा मनुमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्या लक्ष्मीछाया पवार, गायत्री पारखे, अभिजित स्वामी, एस लष्करे, निदा इंडिकर, मयुरी, डिकोंडा, याचे मोलाचे योगदान लाभले असून, या कार्यक्रमास तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, राजकीय नेते, पत्रकार, वकील यांसह अनेकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here