केंद्रीय गृहमंत्री शहांची सभा उधळण्याचा इशारा देणारे पोलिसांच्या ताब्यात

0

By-MH13News, network

आज सोलापुरातील महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी होणाऱ्या केंद्रीय मंत्री अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सभा उधळण्याचा इशारा देणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज दुपारी साडेचारच्या सुमारास शहा आणि फडणवीस सोलापुरात येत आहेत.दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा काही दिवसांपूर्वी शहरातील सभेत आल्यानंतर विद्यार्थी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले आहे.त्याच सोबत ‘अमित शहा गो बॅक’असा इशारा देणाऱ्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

संपूर्ण सोलापूर शहरात चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. अमित शहा यांना झेड प्लस ही सुरक्षा व्यवस्था असल्याने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे सभा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here