पूरग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत ; तातडीने पूल बांधा ,अन्यथा… -सुदीप चाकोते

0

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शौकत नदाफ या तरुणाच्या वारसांची मुस्ती येथे कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व फाउंडेशनच्या वतीने त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.

मुस्ती येथील हरणी नदीवर पूल नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात नदीला पूर येऊन आज पर्यंत पाच ते सहा जणांचा बळी गेलेला आहे या नदीवर पूर व्हावे याकरिता मुस्ती चे सरपंच नागराज पाटील व इतर सर्व मान्यवर शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्नात आहेत कांचन फाउंडेशनचे संस्थापक सुदीप दादा चाकोते यांनी या नदी पात्राची पाहणी केली व या पुला विषयी एकट्यांचे काम नसून आपण सर्वांनी केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडून पूल होणे विषयी प्रयत्न करून सदर पुलाचे काम मार्गी लावूया असे आश्वासन त्यांनी दिले

याप्रसंगी मुस्तीचे सरपंच नागराज पाटील उपसरपंच रमेश चव्हाण ,कांचन फाउंडेशन शाखा मुस्तीचे अध्यक्ष शेखर पाटील,सचिव पिंटू कोळी व्यंकटेश जामादार, कल्याणराव चौधरी, नागेश शहापुरे, दासरे, ग्रामपंचायत सदस्य हरीश शिंदे अशोक कस्तुरे अनिल मणियार, शैलेश पाटील, सिद्धेश्वर कस्तुरे ,शिवराज पाटील, आदीसह कांचन फाउंडेशन शाखा मुस्तीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here